Nanded News | कै. नरहर कुरुंदकर स्मारकासाठी १४.७८ कोटी मंजूर, अशोक चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश

थोर विचारवंत व साहित्यिक कै. नरहर कुरुंदकर (Narhar Kurundkar) यांच्या नांदेड (Nanded News) येथील स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याच्या बांधकामासाठी राज्य सरकारने १४.७८ कोटी रूपये मंजूर केले आहेत. याबाबतचा शासननिर्णय आज जारी करण्यात आला.

कै. नरहर कुरुंदकर यांचे स्मारक पूर्णत्वास यावे, यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा चालवला होता व त्यास अखेर यश आले आहे. सन २०१० मध्ये अशोकराव चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री असताना या कै. नरहर कुरुंदकर यांचे स्मारक उभारण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली होती. सुमारे २ कोटी रूपयांचे कामही पूर्ण करण्यात आले होते. मात्र, त्यांच्यासारख्या थोर साहित्यिक व विचारवंतांचे स्मारक यथोचित व्हावे, यासाठी अधिक काम करण्याची मागणी समोर आली होती. त्यानुसार अशोकराव चव्हाण पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री असताना याच खात्यामार्फत दुसऱ्या टप्प्याचा प्रस्ताव तयार करून घेण्यात आला. नांदेड जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तो राज्य शासनाकडे सादर करण्यात आला. त्या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी अशोकराव चव्हाण सातत्याने प्रयत्नशील होते. राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय भाषणातही त्यांनी या प्रस्तावाच्या मंजुरीचे आश्वासन मिळवून घेतले होते. त्यानुसार आज याबाबतचा शासननिर्णय निर्गमित झाला आहे. कै. नरहर कुरुंदकर यांचे स्मारक पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल खा. अशोकराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Ajit Pawar | निलेशला मीच पक्षात आणलं, त्याला प्रचंड निधीही दिला, पण…. अजित पवारांनी मनातली खदखद बोलून दाखवली

Ajit Pawar | पक्षातून वेगळे झालात, मग शरद पवारांचे फोटो कशाला वापरता? सुप्रीम कोर्टाने अजित पवारांना फटकारले

Nitin Gadkari | नागपूर शहरात २४ तास पाणी पुरवठ्याचे स्वप्न पूर्णत्वाकडे