“पक्षात नवीन आलेल्या माझ्यासारख्या…”, राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर Ashok Chavan यांची पहिली प्रतिक्रिया

Rajya Sabha Election: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत भाजपाशी हात मिळवला. याची भेट म्हणून भाजपाने अशोक चव्हाण यांना राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देऊ केली आहे.

याबद्दल प्रतिक्रिया देत असताना अशोक चव्हाण (Ashok Chavan) म्हणाले की, आज माझे नाव राज्यसभेसाठी जाहीर केल्यामुळे मी भाजपाचा आभारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राज्याचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी माझ्यावर ही जबाबदारी दिली, त्याबद्दल मला आनंद वाटतो. या नेत्यांनी माझ्यासारख्या पक्षात नव्या आलेल्या नेत्यावर विश्वास दाखविल्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे.

 

“माझ्यावर दाखवलेला हा विश्वास मी माझ्या कामातून सार्थ दाखवून देईल. राज्यसभेत सामान्य माणसाचे प्रश्न उचलणे आणि त्यांची सोडवणूक करण्यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील राहिल, हे यानिमित्ताने सांगते”, असेही अशोक चव्हाण यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

महत्वाच्या बातम्या

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष शेलार…; भाजप प्रवेशानंतर बोलताना अशोक चव्हाणांकडून चूक, फडणवीसही हसून बेजार

छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजन समाजाचे राजे, Chhagan Bhujbal यांचे मोठे वक्तव्य

Rajya Sabha Elections | राज्यसभेसाठी शरद पवार मास्टरस्ट्रोक मारण्याच्या तयारीत, छत्रपती शाहू महाराजांना देणार उमेदवारी!