पणजीकरांनी पर्रीकरांना नाकारलं, भाजपचे बाबूश मोन्सेरात विजयी

पणजी : देशातील 5 राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत असून, 3 राज्यांमध्ये भाजपने आघाडी कायम ठेवली आहे. गोव्यात भाजप सर्वात मोठा पक्ष झाला आहे. भाजप सध्या १७ जागांवर आघाडीवर आहे. गोव्यात सर्वात जास्त चर्चेत असणारी जागा म्हणजे पणजी विधानसभा मतरदार संघाची होती. याठिकाणी भाजपने दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचा मुलगा उत्पल पर्रीकर यांनी तिकीट नाकारले होते.

उत्पल पर्रीकर यांनी तिकीट नाकारल्यानंतर बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती. मात्र पंजीकर जनतेने पर्रीकर यांना नाकारलेल दिसत आहे. कारण पणजी मधून भाजपचे बाबूश मोन्सेरात यांचा विजय झाला आहे. पर्रीकर यांच्या ८०० मतांनी पराभव झाला असून हा पर्रीकर याना मोठा धक्का मनाला जात आहे.

दरम्यान, गोव्याचे प्रभारी असलेले देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी उत्पल यांना इतर ठिकाणांवरून लढण्याची विनंती केली होती. त्यासाठी त्यांनी ३ मतदारसंघाचे नावं देखील उत्पल पर्रीकर यांना सुचवले होते. मात्र पर्रीकर यांनी ही ऑफर नाकारत भाजप विरोधात बंडखोरी करत निवडणूक लढवली होती.