नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या मतमोजणीचा पहिला कल आला समोर; पहा कोण आहे आघाडीवर 

मुंबई: राज्यातील पाच पदवीधर-शिक्षण मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या निवडणुकीची चर्चा राज्यातील राजकारणात सुरू होती. नाशिक, अमरावती, नागपूर, औरंगाबाद आणि कोकण अशा पाच मतदारसंघात झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी सुरूवात झाली आहे.

दरम्यान, नाशिक पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील (Shubhangi Patil) तर वंचित बहुजन आघाडीचे रतन बनसोडे तसेच अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांच्यात प्रमुख लढत होत आहे. काँग्रेसशी बंडखोरी करणाऱ्या सत्यजित तांबेंच्या मतांकडे राज्याचं लक्ष लागलेलं असताना आता नाशिक पदवीधर मतदार संघात सत्यजित तांबे यांनी आघाडी घेतली आहे.

महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील पिछाडीवर आहेत. या मतदार संघात दोन्ही उमेदवारांमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळत असून सत्यजित तांबे हे विजयी होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे  नागपूरमध्ये  विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबाले पाच हजार पेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहेत.  सुधाकर आडबोले हे विजयाच्या दिशेने घोडदौड करत आहेत.