टिकाकारांकडे लक्ष न देता सर्वसामान्य जनतेचे प्रश्न तात्काळ सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तत्पर – तटकरे

Sunil Tatkare – पीक विम्याची (Pick Vima) रक्कम तात्काळ शेतकर्‍यांना देण्याचा क्रांतीकारी निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. तरीही काही लोकं टिका करत राहतील त्याकडे लक्ष न देता सर्वसामान्य जनतेचे प्रश्न तात्काळ सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) तत्पर आहे असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी वर्धा येथील मेळाव्यात व्यक्त केला.

अजितदादांनी (Ajit Pawar) घेतलेला निर्णय जनसामान्यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी आज महात्मा गांधी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत आल्याचे सुनिल तटकरे यांनी सांगतानाच एक नवीन पर्व राजकारणात उभे राहिले आहे असा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

या जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जुने लोक पक्षात राहिले नाहीत पण ते आज नाहीत त्यामुळे हा मोठा कार्यकर्ता मेळावा पार पडत आहे. या भागातील महिला आणि पुरुषांची ताकद अजितदादांच्या नेतृत्वाखाली जमा झाली याचा आनंद सुनिल तटकरे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला.

वेळ नवी… नवी पहाट… नवे नेतृत्व… पहाटेच लोकांच्या कामासाठी वाहून घेतलेला नेता आपल्याला लाभलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील वर्धा हा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून भविष्यात उभा राहिल असा विश्वासही सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.

लोकशाही माध्यमातून भाजपसोबत जाण्याचा निर्णय आम्ही घेतला. या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे पण ओबीसीला धक्का न लावता आणि तेही कायद्याच्या आधारावर टिकले पाहिजे असे आरक्षण मिळाले पाहिजे अशी भूमिका पक्षाची आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले.

सगळे नेते अजितदादा पवार यांच्यासोबत आल्याने रोहित पवार (Rohit Pawar) हे नेता बनण्यासाठी सोयीचे राजकारण करत आहेत असा थेट हल्लाबोल सुरज चव्हाण यांनी केला.

या मेळाव्यात महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, माजी जिल्हा परिषद सदस्य राणा रननवरे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, राज्य समन्वयक ईश्वर बाळबुधे, सामाजिक न्याय सेल प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे आदींनी आपले विचार मांडले.

आज अभियानाच्या शेवटच्या दिवशी वर्धा जिल्हयात आगमन होताच प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम आश्रमाला भेट दिली. यावेळी महात्मा गांधी यांच्या आश्रमातील माहिती घेत काही वेळ तिथे घालवला.

‘ घड्याळ तेच वेळ नवी, ‘निर्धार नवपर्वाचा’ या अभियानाच्या पहिल्या टप्प्यातील शेवटचा दिवशी वर्धा जिल्हयातील सेलू येथे कार्यकर्ता मेळावा पार पडला.

या मेळाव्याला माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, राज्य समन्वयक ईश्वर बाळबुधे, सामाजिक न्याय सेल प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे, महिला आयोगाच्या सदस्या आभा पांडे, जिल्हाध्यक्ष शरद शहारे, माजी जिल्हा परिषद सदस्य राणा रननवरे, युवक जिल्हाध्यक्ष मयुर डफळे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

दिवाळीत प्रदूषण करणारे फटाके टाळावेत; विद्याताई चव्हाण यांचे नागरिकांना आवाहन

बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांना ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मतदारांनी धडा शिकवला..

‘सरकारने मराठा आरक्षणावर एकमत केलं पाहिजे; मुख्यमंत्री एक बोलतात, उपमुख्यमंत्री दुसरं बोलतात’