‘सत्तेपासून ‘वंचित’ झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांना वंचित बहुजन आघाडीची आठवण झाली’

मुंबई: अखेर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीत युती झाली आहे. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली. वंचित आघाडी आणि ठाकरे गट आगामी निवडणुका एकत्रितपणे लढणार आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटासाठी मोठं आव्हान उभं राहणार आहे असं सांगितले जात आहे.

दरम्यान, आता या मुद्द्यावरून भाजप नेते नवनाथ बन (BJP leader Navnath Ban) यांनी टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले, सत्तेपासून ‘वंचित’ झाल्यानंतर श्री उद्धव ठाकरे यांना वंचित बहुजन आघाडीची आठवण झाली. पण मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या लढ्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला केलेला विरोध आणि दिलेल्या घोषणा लोक आजही विसरले नाहीत. असं बन यांनी म्हटले आहे.