मुंबई महापालिकेत उध्दव ठाकरेंचा सर्वनाश होणार – नवनीत राणा 

जळगाव  –  विरोधकांना कुठलीही काम उरलं नाही, त्यांना आधीही काम नव्हतं, आता अमित शाह मुंबईमध्ये आलेले आहेत, त्यामुळे मुंबईचं काही ना काही तरी चांगलं होईल, असं खासदार नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. यावेळी मुंबई महापालिकेत यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या पीढीचं भल केलं असं म्हणत नवनीत राणा यांनी नाव न घेता उध्दव ठाकरेंवर टीका केली.

यावेळी लोकांच्या हिताची सरकार मुंबई महापालिकेत आली पाहिजे, आणि त्यासाठी जोमाने लढणार असल्याचेही राणा म्हणाल्या. जे दोन पिढ्यांपासून मुंबईला खाण्याचं काम करताहेत, त्या उध्दव ठाकरेंचा यावेळी सर्वनाश होणार असंही यावेळी नवनीत राणा म्हणाल्या.  आम्ही दोन्ही अपक्ष आमदार आणि खासदार म्हणून काम करत आहोत. पण मोदी यांचे जे विकासाचे मुद्दे आहेत, त्यामुळे आम्ही त्यांचे फॅन असल्याचे नवनीत राणा म्हणाल्या.

 दसरा मेळाव्याबाबत काय म्हणाल्या नवनीत राणा ?

हिंदू विचारधारेच्या प्रत्येक व्यक्तीचा दसरा मेळावा आहे, त्यामुळे एकाने तो साजरा करावा असं नाही. तुम्हीच दसरा मेळावा साजरा करा असं कुठेही लिहीलेले नाही, अस म्हणत नवनीत राणा यांनी उध्दव ठाकरेंना टोला लगावला. एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेवून चालण्याचे काम करत आहे, त्यामुळे एकनाथ शिंदेंचे भाषण त्या मैदानात दसरा मेळाव्यात झालं पाहिजे अशी माझी अपेक्षा असल्याचेही नवनीत राणा म्हणाल्या.