माजी पंतप्रधान Narasimha Rao यांना मिळणार भारतरत्न, मोदी सरकारने केली मोठी घोषणा

PV Narasimha Rao Bharatratna : लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. भारताचे माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव (Narasimha Rao Bharatratna ) यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारने यासंदर्भात घोषणा केली. पीव्ही नरसिंह राव यांना भारतरत्न देऊन सन्मानित केले जाईल, असे पीएम मोदींनी त्यांच्या एक्स अकाउंटवर म्हटले आहे. पीव्ही नरसिंह राव 20 जून 1991 रोजी देशाचे पंतप्रधान झाले होते. यापूर्वी केंद्रातील मोदी सरकारने लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) आणि कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली होती.

पीएम मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांना भारतरत्नने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती देताना आनंद होत आहे. एक प्रतिष्ठित विद्वान आणि राजकारणी म्हणून, नरसिंह राव यांनी विविध पदांवर भारताची मोठ्या प्रमाणावर सेवा केली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि अनेक वर्षे संसद व विधानसभा सदस्य म्हणून त्यांनी केलेल्या कार्यासाठी ते तितकेच स्मरणात आहेत. भारताला आर्थिकदृष्ट्या प्रगत बनवण्यात आणि देशाच्या समृद्धी आणि विकासाचा भक्कम पाया रचण्यात त्यांचे दूरदर्शी नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरले.’

पीएम मोदी पुढे म्हणाले, ‘नरसिंह राव यांचा पंतप्रधान म्हणून कार्यकाळ हा महत्त्वाच्या उपाययोजनांनी चिन्हांकित होता ज्याने भारताला जागतिक बाजारपेठेसाठी खुले केले, ज्यामुळे आर्थिक विकासाचे नवीन पर्व सुरू झाले. शिवाय, भारताचे परराष्ट्र धोरण, भाषा आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान एक नेता म्हणून त्यांचा बहुआयामी वारसा अधोरेखित करते ज्याने केवळ महत्त्वपूर्ण परिवर्तनांद्वारे भारताचे नेतृत्व केले नाही तर त्याचा सांस्कृतिक आणि बौद्धिक वारसाही समृद्ध केला.’

महत्वाच्या बातम्या : 

Vijay Vadettiwar | सरकारी तिजोरी स्वच्छ करण्याच्या मंत्र्यांमधील स्पर्धेला आता ऊत आलाय

Maharashtra Politics | पक्ष चोराचोरीत दंग असलेल्या महायुती सरकारला शेतकऱ्यांचा विसर

Maharashtra Kranti Sena | महायुतीची ताकत वाढली; आणखी एका पक्षाची मिळणार साथ