‘ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांच्या…’, पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिल्यानंतर शरद पवारांची पहिलीच प्रतिक्रिया

NCP Name & Symbol : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP Party) हे नाव आणि घड्याळ हे पक्षचिन्ह अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगानं घेतला आहे. विधिमंडळातील बहुमत चाचणीच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. याचिकाकर्ते अजित अनंतराव पवार यांच्या नेतृत्वाखालील गट हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (NCP Party) असून त्यांना पक्षाचे हे नाव आणि चिन्ह वापरण्याचा अधिकार आहे, असं आयोगानं आपल्या निर्णयात स्पष्टपणे नमूद केलं आहे.

निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर आतापर्यंत शरद पवार यांनी मौन बाळगलं होतं. मात्र आता शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया देताना निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आवाहन देऊ असे म्हटले आहे.

‘निवडणूक आयोगाने आमचं पक्षाचं नावं आणि चिन्ह काढून घेतलं. आमचा पक्ष दुसऱ्यांना दिला. ज्यांनी पक्ष स्थापन केला, पक्षाची उभारणी केली, त्यांच्या हातातून पक्ष काढून घेऊन दुसऱ्यांना दिला, असं देशात याआधी घडलेलं नव्हतं. पण, ते ही निवडणूक आयोगाने आज करून दाखवलं. सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत आणि त्यासंबधीचे निर्णय हे लवकर येतील अशी आमची अपेक्षा आहे’, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या : 

कॉंग्रेसचे नेते Baba Siddique यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश; उपमुख्यमंत्री पवार यांनी केले स्वागत

Nikhil Wagle व सहकाऱ्यांवर पुण्यात प्राणघातक हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करा – पृथ्वीराज चव्हाण

Chhagan Bhujbal | तुमची 5 लोकांनी सुपारी घेतलीये, ५० लाखांची …; छगन भुजबळांना पुन्हा एकदा धमकी