Sonu Sood | आज जयजयकार करता, उद्या चिडवता..; हार्दिक पांड्याला ट्रोल करणाऱ्यांसाठी सोनू सूदची पोस्ट

Sonu Sood On Hardik Pandya | बॉलीवूड अभिनेता सोनू सूद याने क्रिकेटपटू हार्दिक पंड्याच्या समर्थनार्थ पुढे येऊन चाहत्यांना आवाहन केले की ज्या खेळाडूंनी देशाला अभिमान वाटावा असे काम केले, त्यांचा आदर करावा. क्रिकेटर हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांच्या टीकेला सामोरे जावे लागल्यानंतर सोनू सूदने अशी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद स्वीकारल्यापासून पांड्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. आयपीएल 2024 च्या सामन्यांदरम्यान लोकांनी स्टेडियममध्ये त्याची खिल्लीही उडवली होती. सोनू सूदने (Sonu Sood ) कोणत्याही खेळाडूचे नाव न घेता X वर लिहिले की, “आपण आपल्या खेळाडूंचा आदर केला पाहिजे. ज्या खेळाडूंनी आपल्याला अभिमान वाटावा असे कार्य केले, ज्या खेळाडूंनी आमच्या देशाचा गौरव केला. एक दिवस तुम्ही त्यांचा जयजयकार करता आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्यावर टीका करता.”

तो म्हणाला, “ते नाही तर आपणच अपयशी आहोत. मला क्रिकेट आवडते. माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणारा प्रत्येक क्रिकेटपटू मला आवडतो. तो कोणत्या फ्रेंचायझीसाठी खेळतो हे महत्त्वाचे नाही. तो कर्णधार म्हणून खेळतो किंवा संघातील 15वा खेळाडू म्हणून खेळतो याने काही फरक पडत नाही. तो आमचा हिरो आहे.”

कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मुंबई इंडियन्सला पंड्याच्या नेतृत्वाखाली दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध पराभव पत्करावा लागला. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळला गेला होता. पांड्याच्या नेतृत्त्वाखालील मुंबई इंडियन्सला हंगामातील त्यांच्या पहिल्या विजयाची अपेक्षा आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

शिवसेना शिंदे गटाने जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी, पाहा कोणाला मिळालं तिकीट?

Nana Patole | लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी लोकसभा निवडणुकीत एकजुटीने लढण्याची गरज

Prakash Ambedkar | ‘वंचितच्या पाठीत खंजीर खुपसला’! आंबडेकरांचा संजय राऊतांवर हल्लाबोल