राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लोकलमधील ‘त्या’ प्रवाशाचे मानले आभार

Jayant Patil :-  राजकारणाची जाण आणि आवड असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला भाषणे ऐकायची प्रचंड आवड असते. विधिमंडळातील भाषणे तर त्यांच्यासाठी पर्वणीच! असेच एक गृहस्थ आज मुंबईच्या लोकलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाषण ऐकताना दिसले. जयंत पाटील यांनीही त्या गृहस्थाचे आभार मानले आहेत.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लोकलमधील गृहस्थांचा फोटो पोस्ट करत म्हटले आहे की, आज सकाळी मला हा फोटो व्हॉट्सऍप वर कोणीतरी पाठवला.

गेली ३५ वर्ष मी महाराष्ट्राच्या विधानसभेत काम करत आहे. विधानसभेत भाषण झाल्यानंतर अनेकदा सर्वच बाकांवरील सहकारी बाहेर आल्यावर अभिनंदन करतात. मात्र माझ्या मनाला तेव्हाही फारशी स्वस्थता नसते. मात्र, जेव्हा एखादा सामान्य माणूस, महिला कुठेतरी भेटल्यावर मला जवळ येऊन म्हणतात, “तुमचे विधानसभेतील त्या दिवसाचे भाषण चांगले झाले” तेव्हा माझ्या मनाला खरा आनंद होऊन मन सुखावून जाते.

आमच्या सार्वजनिक जीवनाचा खरा केंद्रबिंदू आणि भाग्यविधाता हा सामान्य नागरिकच आहे, अशी माझी ठाम धारणा आहे.

आज मुंबई लोकलमध्ये एवढ्या गडबड आणि धावपळीत हे एक सदगृहस्थ माझे भाषण आवर्जून ऐकत आहेत, हे बघून मनाला समाधान वाटले.

महत्वाच्या बातम्या-

जम्मू-काश्मीरमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला,4 जवान शहीद

कोरोना जेएन-वन व्हेरिएंट: मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा

डॉ. प्रभा अत्रे, डॉ. प्रमोद चौधरी यांना उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते मिळणार ‘अटल संस्कृती गौरव पुरस्कार’

“लोकशाही बसली धाब्यावर! हुकुमशाहीचा उदय की…”, संसदेतून १४१ खासदारांचं निलंब; तेजस्विनी पंडित संतापली