राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधी पक्षामध्येच – जयंत पाटील

मुंबई- जी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यातून मार्ग दाखवावा अशी मागणी अजित पवारांसह (Ajit Pawar) मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या लोकांनी शरद पवार साहेब यांच्याकडे केली आहे. शरद पवार साहेबांना (Sharad Pawar) कोणीही कधीही भेटू शकते. त्यामुळे कोणी भेटायला आले तर त्यांना साहेब नाकारत नाही असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांची भेट घेतली. याचपार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा प्रतोद जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. त्यांनी सांगितले की सध्या निर्माण झालेल्या परिस्थितून मार्ग काढण्यासाठी आमदार शरद पवारां साहेबांच्या भेटीला आले होते असे पत्रकार परिषदेमध्ये जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की आपल्या घरात कोणी आले तर विश्लेषणात्मक टिप्पणी करणे योग्य नाही. ते शरद पवारसाहेना भेटायला आले तेव्हा ते कसे दिसत होते ते नाराज होते का. याच्याशी काहीही संबंध नाही. पवार साहेबांनी आपली भूमिका येवला येथील सभेत अगदी स्पष्ट केली आहे. त्यामुळे प्रत्येक भेटीनंतर शरद पवारां साहेबांनी स्पष्टीकरण दिले पाहिजे असे वाटत नाही

जयंत पाटील म्हणाले की विधीमंडळात रेकॉर्डवर आम्ही सर्व एकच पक्ष आहोत. त्यामुळे काही लोकांनी पक्षविरोधी केलेली कृतीवर कारवाई म्हणून नोटीस बजावलेली आहे. विशेष म्हणजे शरद पवार साहेबांच्या आदेशानेच हे सर्व काम सुरू आहे. आम्ही विधीमंडळात विरोधी बाकावरच बसलेलो आहोत. आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे असे मत त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधी पक्षात आहे. शरद पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असणारे आमचे सर्व आमदार हे विरोधी पक्षातच बसले आहेत. आमच्यातल्या 9 सदस्यांनी सरकारमध्ये शपथ घेतलेली आहे. हेही खरं आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आजची बैठकीची व्यवस्था बघितली तर सर्व विखुरलेल्या पद्धतीने आणि विरोधी पक्षाच्या बाजूला बसलेले आपण बघितले असेल. त्यामुळे शरद पवार साहेबांच्या भेटीला आमदार आल्याने त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उद्भवणे योग्य नाही. कारण गेली अनेक वर्ष ज्यांनी शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम केलं आहे तिच लोक पुन्हा शरद पवार साहेबांना भेटत असतील तर त्यातून शरद पवार साहेबांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं कोणतही कारण नाही असे जयंत पाटील म्हणाले आहे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक वर्ष ज्यांनी काम केलं आहे ते सर्वचजण शरद पवार साहेबांनी निर्माण केलेल्या राष्ट्रवादीचं एक मोठं कुटुंब आहे. त्यातलेच काही लोकांनी वेगळी कृती केलेली आहे. पण तिच लोक आज शरद पवार साहेबांकडे येऊन भेटले आणि यातून मार्ग काढा अशी शरद पवार साहेबांना त्यांनी विनंती केली आहे. त्यामुळे इतर कोणी अस्वस्थ होण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. शरद पवार साहेब हे देशातले अनुभवी नेते आहेत. त्यांच्याकडे जाऊन आमदारांनी विनंती केली की निर्माण झालेल्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी पुन्हा एकदा आग्रहाने सांगितले आहे अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे

विरोधकांची उद्याला होत असलेले बैठकी संदर्भात विचारण्यात आले त्यावेळी जयंत पाटील म्हणाले की शरद पवार साहेब हे युपीएचा भाग आहेत. त्यामुळे बंगळुरू येथे आयोजित बैठकीला जातील त्यांनी त्यांची भूमिका अगदी स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कोणतेही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे काम नाही. विरोधकांच्या बैठकीला का गेले नाही. या प्रश्नावर जयंत पाटील यांनी उत्तर दिले.