पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे रेल रोको आंदोलन, वाचा काय आहे प्रकरण

पुणे : दुरुस्तीचे खोटे कारण सांगत सय्यद नगर रेल्वे गेट नंबर सात हे कायमचे बंद करण्याचा रेल्वे प्रशासनाचा डाव आहे हा डाव हाणून पाडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रेल रोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान पोलिसांनी यावेळी मोठा बंदोबस्त ठेवला होता, यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये वादावादी झाली आणि पोलिसांनी आंदोलकांना रेल रोको करण्यास रोखून धरले.

राष्ट्रवादीचे काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले यामध्ये माजी नगरसेवक फारुक इनामदार, नगरसेवक योगेश ससाने, डॉक्टर शंतनु ,जगदाळे कलेश्वर घुले,संजय शिंदे,सागर भोसले, अविनाश काळे,कबीर शेख, प्रणव राजे भोसले, अर्जुन सातव, बाळासाहेब ससाने, सुप्रिया इनामदार ,महेश सातव, शितल सातव, मीनाताई थोरात ,वैष्णवी सातव, मंदाकिनी सुतार यांच्यासह हजारो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

भाजपची सत्ता पालिकेत आल्यानंतर तत्कालीन भाजपच्या आमदाराने हे गेट बंद केले आहे गेल्या दोनशे वर्षांपासून हे गेट आहे, हे गेट बंद केल्यामुळे दोन लाख नागरिकांची गैरसोय होत आहे . आसपासच्या बारा वाड्यामधील नागरिक या गेटने ये-जा करतात येथील व्यावसायिक रिक्षा चालक यांच्या व्यवसायावर याचा परिणाम होत आहे हे गेट खुले न केल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिला आहे.

अंडरपास भाजपची सत्ता पालिकेत आल्यानंतर बंद करण्यात आलाय यामुळे नागरिकांना मोठा वळसा घालावा लागतो येत्या आठ दिवसात हे गेट खुले न केल्यास आंदोलन, आत्मदहन करण्याचा इशारा माजी नगरसेवक फारुक इनामदार यांनी दिला आहे