‘पक्ष चालवणं उद्धव ठाकरेंचं काम नाही, 11/12 आमदार घेऊन IPL team साठी तयारी करा… मातोश्री 11 बनवा’

मुंबई – महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडी सरकारवर (MVA) राजकीय संकटाचे ढग दाटले आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बंडखोर झाल्याने उद्धव ठाकरे सरकार संकटात (Crisis on Uddhav Thackeray government) सापडले आहे. शिंदे यांची बंडखोर वृत्ती पाहता शिवसेनेने त्यांना विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हटवले असले तरी या निर्णयांमुळे एकनाथ शिंदे हे कोणत्याही दबावाखाली दिसत नाहीत.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांचं सरकार संकटात आल्यावर आता त्यांच्यावर चौफेर टीका होत असल्याचं दिसून येत आहे. इतकं मोठं बंड झाल्यावर त्यांनी सत्ता सोडायला हवी अशीही चर्चा सुरू आहे. त्यातच भाजपा नेत्यांनीही सरकारवर टीका सुरू ठेवलीच असून भाजप नेते निलेश राणे यांनी यावरून शिवसेनेवर प्रहार केला आहे.

शिवसेनेत बंड झाल्यानंतर माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ट्वीटरवरुन त्यांनी उद्धव ठाकरे यांना सल्ला दिला आहे.शिवसेनेचे 11/12 आमदार शिवसेने सोबत राहतील अशी परिस्थीती आहे, पक्ष चालवणं उद्धव ठाकरेंचं काम नाही. हे 11/12 घेऊन IPL team साठी तयारी करा… मातोश्री 11 बनवा असं ट्वीट निलेश राणे यांनी केलं.