Qualifier 1: गुजरात टायटन्सविरुद्ध सीएसकेचा पराभव निश्चित? असं आम्ही नाही आकडे सांगतात

Qualifier 1 : गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज संघात (Gujrat Titans vs Chennai Super Kings) एमए चिंदबरम स्टेडियम, चेन्नई येथे मंगळवारी (२३ मे) आयपीएल २०२३मधील पहिला क्वालिफायर सामना रंगणार आहे. हा सामना जिंकणारा संघ थेट अंतिम सामन्यात प्रवेश करेल. तर पराभूत होणाऱ्या संघाला अंतिम सामन्यात प्रवेश करण्यासाठी आणखी एक संधी मिळेल. दरम्यान पहिल्या क्वालिफायर सामन्यात एमएस धोनीच्या संघापुढे गुजरातचा धडाकेबाज आणि फॉर्मात असलेला फलंदाज शुबमन गिल याचे आव्हान असेल.

शुबमनने (Shubman Gill) गेल्या सामन्यात नाबाद शतक झळकावून विराट कोहलीच्या शतकी खेळीवर पाणी फेरले होते, ज्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा (RCB) संघ आयपीएलमधून बाहेर पडला होता. अशा परिस्थितीत चेन्नईविरुद्धच्या सामन्यात सर्वांच्या नजरा या युवा फलंदाजाकडे असतील. भारताच्या आजवरच्या सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक असलेल्या धोनीकडे त्याच्यासाठी निश्चितच खास रणनीती असेल.

चेन्नईला वचपा काढावा लागेल
दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत तीन सामने झाले असून ते सर्व जिंकण्यात गुजरातला यश आले आहे. म्हणजेच चेन्नईला गुजरातविरुद्ध पहिल्या विजयाचे वेध लागलेले असेल. गुजरातचा कर्णधार हार्दिक चेन्नईचा कर्णधार धोनीला आपला मार्गदर्शक आणि आदर्श मानतो. या मोसमातील पहिला सामना चेन्नई आणि गुजरात यांच्यात खेळला गेला ज्यामध्ये शिष्य हार्दिकने गुरु धोनीवर मात केली. गुजरातने चेन्नईविरुद्धचा पहिला सामना पाच गडी राखून जिंकला होता.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
चेन्नई सुपर किंग्ज: ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि यष्टीरक्षक), दीपक चहर, तुषार देशपांडे, महेश तिक्षाणा (इम्पॅक्ट प्लेयर: मथिशा पाथिराना)

गुजरात टायटन्स: ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, हार्दिक पंड्या (कर्णधार), साई सुदर्शन/विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, मोहम्मद शमी, मोहित शर्मा, यश दयाल (इम्पॅक्ट प्लेयर: जोशुआ लिटल) /दासुन शनाका))