‘मला जन्मालाच का येऊ दिलं ?’ मुलीने डॉक्टरवर दावा ठोकला अन् करोडो रुपये जिंकले…

नवी दिल्ली : ब्रिटनमधून एक अतिशय विचित्र प्रकरण समोर आले आहे, जिथे एका 20 वर्षांच्या अपंग मुलीने तिच्या आईच्या डॉक्टरवर दावा ठोकून करोडो रुपयांची नुकसान भरपाई वसूल केली आहे. वास्तविक, एवी टूम्ब्स (AV Toombs) नावाच्या मुलीने डॉक्टरांवर त्यांच्या एका निष्काळजीपणामुळे ती जन्मत:च अपंग झाल्याचे आरोप केले होते.

आता हे प्रकरण सोशल मीडियावर इतके व्हायरल होत होते की, लोक मुलीला विचारू लागले की तिला हे का हवे आहे. यावर प्रतिक्रिया देताना एवी टूम्ब्सने सांगितले की, तिचा जन्म २००१ मध्ये लिपोमायलोमेनिंगोसेलने सोबतच झाला होता. हा एक प्रकारचा अपंगत्वाचा आजार आहे. ज्याला वैद्यकीय शास्त्राच्या भाषेत स्पाइना बिफिडा असेही म्हणतात. या आजारामुळे एवीने डॉक्टरांवर दावा ठोकत नुकसान भरपाई मागितली होती.

एवीने सांगितले की, डॉक्टर फिलिप मिशेलने तिच्या जन्मापूर्वी तिच्या आईला योग्य औषध लिहून दिले नाही, ज्यामुळे ती अपंग जन्माला आली. डॉक्टर मिशेलने गरोदरपणात आईला योग्य औषधाचा सल्ला दिला असता, तर तीही आज सामान्य माणसांप्रमाणे आयुष्य जगू शकली असती.

आपण अपंगत्व घेऊन जन्माला येणार असल्याचे डॉक्टरांना माहीत होते, असेही तिने सांगितले. डॉक्टरच्या मनात असते तर ते तिला जन्माला येण्यापासून रोखू शकले असते. पण त्यांने तसे केले नाही. त्यांनी मला जन्माला येण्यापासून रोखायला हवे होते. असेही एवी म्हणते. त्यामुळे एव्हीने डॉ. मिशेल यांच्याकडे नुकसान भरपाई म्हणून कोट्यवधी रुपयांची मागणी केली.

एवीने पुढे सांगितले की, प्रसूतीवेळी तिची आई 30 वर्षांची होती. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना प्रथम फॉलिक अॅसिड घेण्याचा सल्ला दिला. मात्र नंतर चांगला आहार घेत असेल तर याची गरज नाही, असे सांगून औषध घेण्यास नकार दिला.

लंडन हायकोर्टात न्यायमूर्ती रोजालिंड कोए क्यूसी यांनी या प्रकरणाची सुनावणी करताना एवीचे समर्थन केले आणि डॉक्टरांना लाखोंचे नुकसान भरण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर डॉक्टरांनी एवीच्या आईला योग्य सल्ला दिला असता तर आज ती अपंगत्व घेऊन जन्माला आली नसती, असेही ते म्हणाले.

एवी ही अपंग असली तरी ती एक उत्तम घोडेस्वार आहे. तिच्या इंस्टाग्राम अकाउंट evie.toombes वर 22 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती दररोज तिच्या अकाउंटवर घोडेस्वारीचे व्हिडिओ शेअर करत असते, ज्याला नेटकऱ्यांचा अफाट प्रतिसाद मिळत आहे.