राष्ट्रपती विधवा असल्याने नव्या संसदेच्या उद्घाटनाला बोलवलं नाही, हाच का तुमचा सनातन धर्म?- उदयनिधी

Udaynidhi Stalin: तमिळनाडूतील सत्तारुढ द्रमुक सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन (Chief Minister M. K. Stalin) यांचा दिवटा पुत्र उदयनिधीने (Udayanidhi) सनातन धर्माविषयी (Sanatan Dharma) गरळ ओकल्याने वादग्रस्त ठरला. आता पुन्हा एकदा उदयनिधीने सनातन धर्मावर टीका करताना विवादास्पद विधान केले आहे. अलीकडेच नव्या संसद भवनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती यांना बोलावण्यात आले नाही. त्या विधवा आणि आदिवासी असल्यानेच त्यांना बोलावण्यात आले नाही, असा आरोप उदयनिधीने केला आहे. मदुराई येथील कार्यक्रमात ते बोलत होते.

उदयनिधी म्हणाले की, ‘नव्या संसद इमारतीचे उद्धाटन करण्यात आले. भाजपने उद्धाटनासाठी तमिळनाडूमधून अधिनाम Adheenams घेतला. पण, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना बोलावण्यात आलं नाही, कारण त्या विधवा आणि आदिवासी समाजातून येतात. हाच सतानत धर्म आहे का? म्हणून आम्ही याविरुद्ध आवाज उठवत राहू.’ असे त्याने म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-