पोलिसांच्या वाहनातूनच कालिचरण महाराजाने दिला ‘हा’ नवा नारा !

वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिजित उर्फ कालीचरण सराटला काल वर्धा पोलिसांनी ताब्यात घेत न्यायालयात हजर केले. रायपूर येथून पहाटे तीन वाजता आणल्यावर कालिचरण महाराजला सेवाग्राम पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते. सकाळी 11 वाजता दरम्यान सेवाग्राम येथून पोलिस न्यायलयात नेत असताना कालिचरण महाराजाने परत वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

पोलिसांच्या वाहनातून महाराजने जातीवाद छोडीये हिंदुत्व जोडीयेचा दिला नारा दिला. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींवर वादग्रस्त वक्तव्य करणा-या अभिजित उर्फ कालीचरण सराटवर वर्धा शहर पोलिसात भादवीच्या कलम 153, 502(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. कालीचरण हे छत्तीसगढ राज्यातील रायपूरच्या सेंट्रल जेलमध्ये या प्रकरणी अटकेत होते. यानंतर त्यांना वर्धा शहर पोलिसांनी मंगळवारी संध्याकाळी पाच वाजता ताब्यात घेत वर्ध्यात आणले.

मध्यरात्री तीन वाजता दरम्यान कालिचरण यांना कडेकोट पोलीस बंदोबस्तात आणण्यात आले. त्यांची सेवाग्राम पोलीस ठाण्यात विचारपूस करत सकाळी अकरा वाजता महाराजाला न्यायालयात हजर करण्यासाठी पोलिसांनी बाहेर काढले. न्यायाल्याने त्यांना 14 दिवसांची कोठडी सुनावली. यानंतर आरोपीच्या वकिलांनी महाराजाचा जमीन अर्ज दाखल केला. यावर न्यायालयात अद्याप निर्णय आलेला नाहीय. न्यायालयीन कोठडी सुनावल्याने वर्धा पोलिस परत महाराजाला नियमानुसार रायपूर येथील कारागृहाला सुपूर्द करणार आहे.