NIA आपले काम उत्तम रित्या करते आहे, पण नागरिकांचीही काही जबाबदारी आहे की नाही?

Pune – राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने आयसिसशी संबंधित प्रकरणात काल आणखी एका व्यक्तीला अटक केली. पुण्यातील कोंढवा इथं छापा टाकून डॉ. अदनान अली सरकार याला अटक करण्यात अली असून त्याच्या घरातून इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं आणि इसीसशी संबंधित कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत. हा आरोपी दहशतवादी कारवायांसाठी तरुणांची भरती करत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी एनआयएनं या आधी मुंबई, ठाणे आणि पुण्यातून चौघांना अटक केली आहे.

दरम्यान, या सर्व घडामोडींवर आता लेखिका शेफाली वैद्य यांनी भाष्य केले आहे. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी आपल्या भावना व्याक्त केल्या आहेत. यात त्यांनी NIA चे कौतुक तर केलेच आहे मात्र NIA आपले काम उत्तम रित्या करते आहे, पण नागरिकांचीही काही जबाबदारी आहे की नाही? अजून एक २६/११ घडण्याची वाट पाहतोय का आपण? असे मार्मिक सवाल देखील उपस्थित केले आहेत. 

त्या म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज आणि पहिल्या बाजीराव पेशव्यांचे पुणे, हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणारे पुणे, एकेकाळी भगव्या झेंडयाच्या सामर्थ्यावर सर्व इस्लामी आक्रमकांच्या छातीत धडकी भरवणारे पुणे शहर आज इस्लामी दहशतवाद्यांचे एक महत्वाचे केंद्र बनलेले आहे. लव्ह जिहादच्या केसेस आता पुण्याच्या प्रत्येक भागात घडत आहेत, त्याशिवाय मुलींचे विनयभंग, स्त्रियांवरचे गुन्हेही वाढतच आहेत आणि आता तर पुणे NIA च्या रडारवर आहे.

काल पुण्यात NIAने कोंढव्यातून डॉ. अदनानअली कमरअली सरकार या ४३ वर्षांच्या भूलतज्ञाला अटक केली आहे. डॉ. अदनानीच्या कोंढव्यातल्या घरात एनआयएला इलेक्ट्रॉनिक गैजेटस आणि ISIS शी संबंधित अनेक दस्तऐवज सापडले आहेत. मुसलमान तरुणांची माथी भडकावून त्यांना दहशतवादी कारवायांसाठी उद्युक्त करण्याची जबाबादारी डॉ. अदनान अली पार पाडत होता.

नोबेल हॉस्पिटल ह्या हडपसरच्या एका मोठ्या खासगी हॉस्पिटल मध्ये हा अदनान अली भूलतज्ज्ञ म्हणून काम करत होता. ह्या हॉस्पिटलच्या पेरोलवर अनेक शांतिदूत आहेत. ह्या सर्वांचे कोंढवा हे केंद्र आहे. एनआयएने केलेली ही गेल्या एका महिन्यातली पाचवी अटक आहे.

२८ जून २०२३ रोजी गुन्ह्याची नोंद केली होती. त्यानंतर मुंबई, ठाणे आणि पुणे येथे मोठ्या प्रमाणावर छापेमारी केल्यानंतर ३ जुलै २०२३ रोजी एनआयएने मुंबईतील तबिश नासेर सिद्दिकी, पुण्यातील जुबेर नूर मोहम्मद शेख ऊर्फ अबू नुसैबा आणि ठाण्यातील शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला अश्या चार जणांना अटक केली आहे. ह्यातले बरेचसे संशयित दहशतवादी उच्चशिक्षित असून चांगल्या पदावर नोकरीला होते.

बरेचचा इस्लामी दहशतवादाचा खास पुळका असणारे तथाकथित पुरोगामी लोक ह्या असल्या नमकहराम लोकांचे समर्थन करताना ’गरीब, अशिक्षित मुसलमान तरुण संधीच्या आणि शिक्षणाच्या अभावी दहशतवादी बनतात’ असा लंगडा युक्तिवाद करतात. डॉक्टर असलेल्या अदनान अली आणि इंजिनियर असलेल्या कोथरूडच्या जुबेरला झालेली अटक म्हणजे ह्या लोकांच्या सेक्युलर गालावर बसलेली सणसणीत चपराक आहे. अर्थात ह्यामुळे हे लोक सुधारणार नाहीतच म्हणा.

पण इस्लामी दहशतवादाने पुणे शहरात आणि संपूर्ण महाराष्ट्रात कुठवर पाय रोवलेत ह्याची ही एक फक्त झलक आहे. आपण जोवर जागे होत नाही आणि सावध होत नाही तोवर हे असेच राहणार. NIA आपले काम उत्तम रित्या करते आहे, पण नागरिकांचीही काही जबाबदारी आहे की नाही? अजून एक २६/११ घडण्याची वाट पाहतोय का आपण?

ता.क – ही पोस्ट वाचल्यावर काही उंटावरून शेळ्या हाकणारे बिनडोक पुरोगामी येऊन ‘पण पण पण, कुरुलकरांचे काय, त्यावर बोला की’ असा मूर्ख प्रश्न विचारून त्यांची हातखंडा व्हाटअबौटरी करतील. कुरुलकरांचे कुठल्याही हिंदुत्ववाद्याने समर्थन केलेले आजवर मी तरी पाहिलेले नाही. उलट केंद्रात मोदी सरकार असताना कुरुलकरांना अटक झाली ही मला देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आश्वस्त करणारी बाब वाटते. आरोपी कोणीही असो, त्याची गय केली जाणार नाही हाच संदेश जनतेला मिळतो आहे.

फरक हा आहे की कुरुलकरांचे समर्थन हिंदुत्ववादी करत नाहीत पण ह्या अदनान अलीचे समर्थन करायला अनेक इस्लामीस्ट आणि त्यांच्या टाकलेल्या अन्नावर जगणारे बिनडोक पाळीव प्राणी, म्हणजे हिंदू नावांनी वावरणारी तथाकथित जमात-ए-पुरोगामी आवर्जून बाह्या सावरून येतील. बघाच तुम्ही. – शेफाली वैद्य