‘भोंगे काढल्याने आणि हनुमान चालीसा म्हटल्याने नवनिर्माण होणार नाही तर महाराष्ट्र उद्ध्वस्त होईल’

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray ) यांची बहुचर्चित सभा नुकतीच पार पडली. आक्रमक हिंदुत्वाचा पुरस्कार केल्याने अवघ्या देशाचे लक्ष राज ठाकरे यांनी स्वतःकडे वेधून घेतले असताना आज राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष होते. यावेळी राज ठाकरे यांनी शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्यावर जातीयवादाचा आरोप करत आपल्या खास शैलीत समाचार घेतला. यावेळी भोंग्यांच्या मुद्द्यावरून सुद्धा त्यांनी आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे.

ते म्हणाले, या आधी पण लाऊड स्पीकरवर (Loudspeaker) बोललो, अनेक जन बोलले, मी फक्त पर्याय (Option) दिला, तुम्ही जर काढले नाही, तर आम्ही हनुमान चालीसा (Hanumaan Chalisa) मोठ्या आवाजात लावू. मस्जिद बरोबर मंदिरांवरचे अनधिकृत भोंगे काढू. पण मस्जिदवरचे काढल्यानंतर, असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभेत केले. आम्हाला राज्यात दंगे नको आहेत. मुस्लीम लोकांना पण त्रास होतो. हा धार्मिक विषय नाही, सामाजिक विषय आहे. त्याला धर्म लावला तर आम्ही धर्माने उत्तर देऊ. आम्हाला परिस्थिती खराब करायची नाही, असे राज ठाकरे यांनी सांगितले. दरम्यान, आता राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या भोंग्यांच्या मुद्द्यावर सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (NCP leader Dhananjay Munde) यांनी भाष्य केले आहे.

एबीपी माझा ने दिलेल्या वृत्तात ते म्हणाले, भोंगे काढल्याने आणि हनुमान चालीसा म्हटल्याने देशातील बेरोजगारी (Unemployment) संपणार आहे का किंवा महागाई (Inflation) कमी होणार आहे का ? हे जर होणार असेल तर राज ठाकरेंच्या भूमिकेचं स्वागत करु. मात्र तरुणांची माथी भडकवली तर एक पिढी उद्ध्वस्त होईल, असं धनंजय मुंडे म्हणाले.

भोंगे काढल्याने आणि हनुमान चालीसा म्हटल्याने नवनिर्माण होणार नाही तर महाराष्ट्र उद्ध्वस्त होईल, असं उत्तर धनंजय मुंडे यांनी दिलं. ठाकरे हे कोणाच्या जीवावर होऊन जाऊ दे म्हणतात आणि काय होऊन जाऊ द्यायचं ते देखील त्यांनी स्पष्ट करावं, असंही धनंजय मुंडे म्हणाले.

राज ठाकरे यांच्या भाषणामध्ये कुठेही बेरोजगारी आणि महागाईवर बोललेलं पाहायला मिळत नाही. राज ठाकरे यांची सभा म्हणजे भोंगा लावणं आणि भोंगा काढणं अशी आहे. त्यामुळे तरुण आणि पुढची पिढी बरबाद होईल असं राज ठाकरे यांनी काही करु नये असा देखील सल्ला धनंजय मुंडे यांनी राज ठाकरेंना दिला.