शरद पवारांसारखे संधीसाधू विरोधी पक्षात आहेत तोवर मोदींचा पराभव अशक्य आहे – वागळे 

नवी दिल्ली : मुंबई : काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी अदाणी उद्योग समूहाविरोधात देशभरात रान उठवलेलं आहे. त्याचवेळी काँग्रेसचा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (NCP chief Sharad Pawar )मात्र अदाणी समूहाच्या (Adani Group) समर्थनार्थ पुढे आले आहेत. शरद पवार यांनी एनडीटीव्हीचे मुख्य संपादक संजय पुगलिया यांच्याशी खास बातचीत केली. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी  अदानी समुहाला पाठिंबा देत हिंडेनबर्ग अहवालावर टीका केली.

गौतम अदानी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने तज्ज्ञांची समिती नेमली आहे. अशा स्थितीत विरोधी पक्षांनी JPC ची मागणी करण्याची आवश्यकता नव्हती, असं म्हणत पवारांनी विरोधी पक्षांनाही घरचा आहेर दिल्याचं पाहायला मिळालं. पवार म्हणाले, हिंडेनबर्ग अहवालाची जेपीसी चौकशी करण्याच्या काँग्रेसच्या एकतर्फी मागणीवर, त्यांनी स्पष्टपणे सांगितले की ते त्यांच्या महाराष्ट्रातील मित्रपक्षाच्या मतांशी सहमत नाहीत.

शरद पवार यांनी NDTV ला दिलेल्या मुलाखतीत अदानी समुहाच्या मुद्द्यावर म्हटलं होतं की, हिंडेनबर्गच्या अहवालाला इतकं महत्त्व का दिलं जातंय? आम्ही त्यांच्याबद्दल कधीच ऐकलेलं नाही, त्याची पार्श्वभूमी काय आहे. जेव्हा आपण असे मुद्दे उपस्थित करतो, ज्यामुळे संपूर्ण देशात गोंधळ होतो, तेव्हा देशाच्या अर्थव्यवस्थेला त्याची किंमत मोजावी लागते, या गोष्टींकडे दुर्लक्ष करता येणार नाही. लक्ष्य केल्यासारखं दिसतंय.

दरम्यान, या मुलाखतीनंतर जेष्ठ पत्रकार निखील वागळे यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. विशेष म्हणजे टीका करताना वागळे यांनी पवारांचा उल्लेख थेट संधिसाधू असा केला आहे.शरद पवारांसारखे संधीसाधू विरोधी पक्षात आहेत तोवर मोदींचा पराभव अशक्य आहे! शरद पवारांनी अदानीला पाठीशी घातलं यात आश्चर्य ते काय! मैत्रीला जागलं पाहिजे नाही का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

प्रत्येक अडचणीच्या वेळी शरद पवारांनी मोदींना मदत केली आहे. त्यांची ताजी मुलाखत हा मोदानी बचावचा उघड प्रयत्न आहे. लोकशाही वगैरे किरकोळ गोष्टी काय, नंतर वाचवता येतील, असं पवारांचं म्हणणं असावं! अशी टीका करत वागळे यांनी पवारांचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.

Modi, Pawar share dais, trigger talks of political realignment | IndiaTV  News | National News – India TV