अदानी प्रकरणी JPCच्या मागणीला शरद पवारांचा पाठिंबा नाही; विरोधकांच्या एकीला सुरुंग ?

नवी दिल्ली : भारतीय राजकारणातील दिग्गज आणि सध्याच्या काळात विरोधी पक्षातील सर्वात प्रमुख आवाज असलेल्या शरद पवार यांनी एनडीटीव्हीचे मुख्य संपादक संजय पुगलिया यांच्याशी खास बातचीत केली . राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही अदानी समुहाला पाठिंबा देत हिंडेनबर्ग अहवालावर टीका केली.

गौतम अदानी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने तज्ज्ञांची समिती नेमली आहे. अशा स्थितीत विरोधी पक्षांनी JPC ची मागणी करण्याची आवश्यकता नव्हती, असं म्हणत पवारांनी विरोधी पक्षांनाही घरचा आहेर दिल्याचं पाहायला मिळालं. पवार म्हणाले, हिंडेनबर्ग अहवालाची जेपीसी चौकशी करण्याच्या काँग्रेसच्या एकतर्फी मागणीवर, त्यांनी स्पष्टपणे सांगितले की ते त्यांच्या महाराष्ट्रातील मित्रपक्षाच्या मतांशी सहमत नाहीत.

शरद पवार यांनी NDTV ला दिलेल्या मुलाखतीत अदानी समुहाच्या मुद्द्यावर म्हटलं होतं की, हिंडेनबर्गच्या अहवालाला इतकं महत्त्व का दिलं जातंय? आम्ही त्यांच्याबद्दल कधीच ऐकलेलं नाही, त्याची पार्श्वभूमी काय आहे. जेव्हा आपण असे मुद्दे उपस्थित करतो, ज्यामुळे संपूर्ण देशात गोंधळ होतो, तेव्हा देशाच्या अर्थव्यवस्थेला त्याची किंमत मोजावी लागते, या गोष्टींकडे दुर्लक्ष करता येणार नाही. लक्ष्य केल्यासारखं दिसतंय.