उपमुख्यमंत्री अजितदादांनी शब्द पाळला, राज्यातील आमदारांना दसऱ्याचे गिफ्ट

ajit pawar

मुंबई : आमदारांचा स्थानिक विकास निधी दोन कोटींवरुन तीन कोटी करण्याचा निर्णय घेताना भविष्यात यात आणखी वाढ करण्याचा शब्द उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजितदादा पवार यांनी सभागृहात दिला होता. हा शब्द अजितदादांनी पाळला असून आमदारांच्या स्थानिक विकास निधीत आणखी एक कोटींची भरघोस वाढ केली आहे, त्यामुळे आता प्रत्येक आमदाराला त्याच्या मतदारसंघात विकास कामांसाठी प्रत्येक वर्षी चार कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. अजितदादांनी हा निर्णय घेतल्याबद्दल सत्ताधाऱ्यांसह विरोधी आमदारांच्यात सुध्दा आनंदाचे वातावरण असून दसऱ्याच्या पूर्वसंध्येला त्यांना मोठे गिफ्ट मिळाले आहे.

गेल्या दीड वर्षापासून राज्यासह देश कोरोना संकटाचा सामना करत आहे. या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्रसरकारने खासदारांचा विकास निधी गोठवला आहे. त्यामुळे स्थानिक विकास कामांसाठी खासदारांच्याकडे कोणताही निधी उपलब्ध नाही.

तर राज्यातल्या आमदारांच्या स्थानिक विकास निधीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक कोटीची वाढ करुन तो तीन कोटी करण्याची घोषणा सभागृहात केली होती, तसेच भविष्यात या आमदारांच्या स्थानिक विकास निधीत आणखी वाढ करण्याचा शब्द दिला होता. हा शब्द पाळताना अजितदादांनी आमदारांचा विकास निधी चार कोटी रुपये केला आहे. आमदारांच्या स्थानिक विकास निधीत वाढ केल्यामुळे सामान्य जनतेच्या विकासांची कामे मार्गी लागण्यास मदत होणार आहे.

विधानसभेतील २८८ आणि विधान परिषदेतील ६२ अशा एकूण ३५० आमदारांना ३५० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे राज्यभरातील सर्व आमदारांना मिळून आता प्रत्येकवर्षी एकूण १४०० कोटी रुपयांचा स्थानिक विकास निधी मिळणार आहे.

राज्याच्या इतिहासातील आमदारांच्या स्थानिक विकास निधीतील वाढीची आतापर्यंतची ही सर्वात मोठी वाढ आहे. त्याचबरोबर आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून, प्रत्येकी एक कोटीचा निधी कोरोनाप्रतिबंधक उपाययोजनांसाठी खर्च करण्यास आमदारांना परवानगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती.

हे देखील पहा 

https://www.youtube.com/watch?v=6G0mG90ZKWk

Previous Post
jagdish agrwal

नेता सर्वसामान्यांचा : जगदीश ललित आगरवाल !

Next Post
rikshaw

मोठी बातमी : ऑटोरिक्षाच्या भाडेदरात 8 नोव्हेंबरपासून वाढ

Related Posts
एमएस धोनीची १५ कोटींची फसवणूक, या स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनीविरुद्ध गुन्हा केला दाखल

एमएस धोनीची १५ कोटींची फसवणूक, या स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनीविरुद्ध गुन्हा केला दाखल

MS Dhoni: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने एका स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनीविरुद्ध फौजदारी खटला दाखल केला आहे.…
Read More
Jasprit Bumrah बनला नंबर 1 कसोटी गोलंदाज, क्रिकेटच्या इतिहासात असा विक्रम पहिल्यांदाच झाला

Jasprit Bumrah बनला नंबर 1 कसोटी गोलंदाज, क्रिकेटच्या इतिहासात असा विक्रम पहिल्यांदाच झाला

Jasprit Bumrah ICC Test Ranking : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला अखेर जे मिळायला हवे होते तेच…
Read More