Allard University Pune | ‘आम्ही अलार्ड आहोत, आम्ही वेगळे आहोत’, अ‍ॅलार्ड विद्यापीठ पुणे येथे २०२४ पासून प्रवेश सुरू

पुणे : भारतातील अलार्ड विद्यापीठ पुणे (Allard University Pune) आपल्या प्रणालीसह विविध क्षेत्रात अनेक नवीन प्रोग्रॅम सुरू करत आहे. याच अनुषंगाने आता पुण्यात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ सुरू होणार्‍या सत्रात अ‍ॅलार्ड युनिव्हर्सिटी पुणे विद्यार्थ्यांच्या भवितत्व लक्षात घेऊन पदवी, पदव्युत्तर, आणि पी.एच.डी. विविध विषयांचे नवीन आणि नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमाची सुरूवात करत आहोत.

‘आम्ही अ‍ॅलार्ड आहोत, आम्ही वेगळे आहोत’ या तत्त्वज्ञानासह अ‍ॅलार्ड विद्यापीठ पुणे (Allard University Pune) आता मनोवृत्ती, नेतृत्व, दक्षता, तत्परता आणि समर्पण या पाच स्तंभांवर आधारित शैक्षणिक उत्कृष्टतेला चालना देईल. येथे, ७० टक्के व्यावहारीक आणि ३० टक्के थेरॉटीकल शिक्षण असेल तसेच विद्यार्थ्यांना १०० टक्के इंटर्नशिपची हमी मिळेल. अशी माहिती विद्यापीठ संस्थापक आणि कुलाधिपती डॉ.एल.आर. यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

येथे प्रवेश मिळविण्यासाठी, अलार्ड प्रवेश परीक्षेत उच्च गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांनाच अ‍ॅलार्ड विद्यापीठ शिष्यवृत्ती २०२४-२५ ही भेट मिळेल. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना १००, ७५, ५० आणि २५ टक्के शिष्यवृत्ती मिळेल. येथे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी ऑनलाइन अलार्ड प्रवेश परीक्षा घेतली जाईल. ही परीक्षा भाषेवर नाही तर बुद्धिमत्तेवर आधारित असेल.

डॉ.एल.आर. यादव पुढे म्हणाले की, देशसेवा आणि समाजाच्या उन्नतीसाठी ज्यांनी कार्य केले अशा पालकांच्या पाल्यांना विविध शिष्यवृत्ती देण्यात येईल. रक्षा शिष्यवृत्ती: सेवा पदक विजेत्यांना ५० टक्के, शौर्य पदक विजेत्यांना १०० टक्के, कोणत्याही संरक्षण सेवा पुरस्कारासाठी १५ टक्के, कर्तव्य निभावतांना जीवनाच्या बलिदानासाठी १०० टक्के,

क्रीडा शिष्यवृत्ती (सरकारद्वारे मान्यताप्राप्त): आंतरराष्ट्रीय पदक विजेते १०० टक्के, राष्ट्रीय पदक विजेते ७५, राज्य पदक विजेते ५०, जिल्हा पदक विजेते १५ टक्के.

धन्यवाद शिष्यवृत्तीः अ‍ॅलार्ड ग्रुप कर्मचारी ५० टक्के, अ‍ॅलार्ड ग्रुपचे माजी कर्मचारी २५, सध्याचे विद्यार्थी भावंडे २५, माजी विद्यार्थी ५०, माजी विद्यार्थी विस्तारित कुटुंब २५ टक्के.

२५ टक्के शिष्यवृत्ती सर्व प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांना, २५ टक्के स्वातंत्र्य सैनिक कुटुंबांना आणि अनाथ मुलांना ५० टक्के शिष्यवृत्ती दिली जाईल.

अलार्ड विद्यापीठ पुणे बद्दल तपशीलवार माहिती:

डॉ.एल.आर. यादव यांच्या योग्य नेतृत्वाखाली १९९९ मध्ये अलार्ड चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना झाली. अ‍ॅलार्डच्या रौप्यमहोत्सवी वर्षात शिक्षणातील उत्कृष्टतेचा वारसा पुढे नेतांना महाराष्ट्र सरकारने २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी अ‍ॅलार्डला विद्यापीठाचा दर्जा बहाल केला आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य सक्षम करण्यासाठी विद्यापीठाने विविध शिष्यवृत्ती देऊ केल्या आहेत. या शिष्यवृत्ती, गुणवत्ता-आधारित आणि गरज-आधारित पुरस्कारांसह, आर्थिक अडथळे कमी करण्यासाठी आणि पात्र विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक लक्ष्य साध्य करण्यासाठी सक्षम करण्यासाठी डिझाइन केले आहे.
आलर्ड विर्शी पुणे द्वारे प्रायोजीत स्कूल
? अ‍ॅलार्ड स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीः
? कम्प्यूटर सायन्स अँड इंजिनियरींग, आर्टीफिशीयल इंटेलिजेन्स अँड डाटा सायन्स, आर्टीफिशियल इंटेलिजेन्स अँड मशीन लर्नींग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्यूनिकेशन, सेमिकंडक्टर, मेकॅनिकल (स्मार्ट मॅन्यूफॅक्चरींग), सिव्हील कन्स्ट्रक्शन अँड मॅनेजमेंट, इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग, इलेक्ट्रिकल व्हेकल, रोबोटिक ऑटोमेशन, सायबर सिक्यूरेटी अँड फॉरेन्सिक्, सॉफ्टवेअर डेव्हलमेंट अँड डिजिटल कम्युनिकेशन इत्यादीचा समावेश आहे.
? अ‍ॅलार्ड स्कूल ऑफ मॅनेजमेंट प्रोग्रॅम – एमबीए, एमसीए, बीबीए आणि बीसीए
? अ‍ॅलार्ड स्कूल ऑफ फार्मसी प्रोग्रॅम – डी फार्म, बी फार्म, एम फार्म
? अलार्ड स्कूल ऑफ हेल्थ एंड बायोसायन्सेस प्रोग्रॅम- बी.एच.ए. एम.एच.ए, एम.पी.एच
? बी.एस.सी (जीवन-विज्ञान आणि बायटेक्नालॉजी) आणि पॅरामेडिकल कोर्सेस
? अ‍ॅलार्ड स्कूल ऑफ लॉ प्रोग्रॅम- एलएलबी (३ वर्षे) आणि एलएलबी (५ वर्षे)
? अलार्ड स्कूल ऑफ डिझाईन प्रोग्रॅम -बीडीईएस इन फॅशन डिझाइन, प्रोडक्ट डिझाइन, विज्यूअल कम्यूनिकेशन, बॅचलर विज्यूअल आर्टस, बॅचलर ऑफ फाइन आर्टस
? संशोधनासाठी प्रत्येक शालेय कार्यक्रमात पीएचडी कार्यक्रम सुरू आहे.
? अलार्ड स्कूल ऑफ इंटरडिसिप्लीनरी रिसर्चमध्ये प्रत्येक स्कूलला पीएचीडी प्रोग्राम आहे
या परिषदेत संस्थेचे सचिव डॉ.आर.एस.यादव आणि अलार्ड विद्यापीठ पुणेचे विपणन विभागाचे वरिष्ठ संचालक पी.ए.व्ही.एस. शेखर उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

पुणे तिथे काय उणे? पुण्यासाठी मोहोळ, धंगेकर, मोरे आले एकत्र

Prakash Ambedkar | वंचितला अजून पाठींबा दिलेला नाही, मनोज जरांगेंनी फेटाळला प्रकाश आंबेडकरांचा दावा

Mumbai LokSabha | मुंबईतील सहापैकी चार लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडे, कोणा कोणाला मिळालं तिकीट?