… कुठला आमदार पळून तर गेला नाही ना ? निलेश राणेंची खोचक टीका

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Shiv Sena chief and Chief Minister Uddhav Thackeray) यांची २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर पूर्ण ताकदीने पहिल्यांदाच औरंगाबाद येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात आज सायंकाळी सभा होणार आहे. मराठवाड्यातील शिवसेनेच्या पहिल्या शाखा स्थापनेला ८ जून रोजी ३७ वर्षे पूर्ण होत आहे. या निमित्ताने होणाऱ्या ‘हिंदुत्वाचा हुंकार’ (hindutva hunkar) या घोषवाक्यासह मुख्यमंत्र्यांच्या सभेचा जोरदार प्रचार केला आहे.

उद्धव ठाकरेंच्या सभेनिमित्त शिवसेना मोठ्या ताकदीने शक्तिप्रदर्शन करणार आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut), मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai), विधान परिषद उपसभापती निलम गोऱ्हे (Neelam Gorhe), नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्यासह मराठवाड्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. तसेच शहरात १० हजार भगवे ध्वज, २०० होर्डिंग, स्वागत बॅनर, चौकाचौकांत सर्वत्र भगवे ध्वज फडकविण्यात आले आहेत.

दरम्यान, एका बाजूला या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले असताना आता विरोधक मुद्दाम शिवसेनेला डिवचत आहेत. भाजप नेते निलेश राणे (BJP leader Nilesh Rane) यांनी मुंबईत आमदारांना राज्यसभा निवडणुकीसाठी एकत्र ठेवल्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेला टोला लगावला आहे, ते म्हणाले, आज शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याची जाहीर सभा संभाजीनगर (sambhajinagar) मध्ये आहे पण पूर्ण लक्ष राहणार मुंबईत की कुठला आमदार पळून तर गेला नाही ना असं राणे यांनी म्हटले आहे.