चंद्रकांत पाटील यांनी केले मतदार संघातील सर्व कष्टकरी नागरिकांना रेनकोट-छत्र्यांचे वाटप

पुणे – कोथरूड भागात अनेक वस्ती भाग आहेत. तेथे मुख्यतः कष्टकरी समाज मोठ्या प्रमाणात राहतो.सध्या पावसाचा जोर अजून राहणार आहे त्यामुळे कष्टकरी व मजूर नागरिकांना दैनंदिन काम करण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. हि अडचण लक्षात घेऊन कोथरूड चे आमदार व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (State President of BJP Chandrakant Patil) यांनी मतदार संघातील सर्व कष्टकरी नागरिकांना रेनकोट व छत्री (Raincoat and umbrella) यांचे वाटप केले.

पहाटे वर्तमानपत्र व दूध वितरण करणारे, रिक्षाचालक, पोस्टमन, अंगणवाडी सेविका व मदतनीस, आशा ताई, स्वच्छता कर्मचारी, सफाई कामगार यांच्या शिवाय कोणत्याही शहराचा कारभार चालूच शकत नाही. हे सर्व कर्मचारी सेवा देतात म्हणून बाकी समाजाचे जगणे सुकर होते. हा सर्व कष्टकरी समाज हाच समाजाचा कणा आहे. त्यांचे जीवन थोडेसे तरी सुकर व्हावे या साठी कोथरूड चे लोकप्रिय आमदार चंद्रकांत पाटील यांनी छत्री, रेनकोट इ. चे वाटप केले.तसेच ज्यांचे घराचे छत गळत आहे त्यांना छताच्या आकाराची ताडपत्रीचे सुद्धा वाटप केले आहे.

हातावरचे पोट असल्यामुळे कितीही पाऊस असेल तरी रोज कामाला जावेच लागते आणि भिजत काम करावे लागते. भर पावसातही काम करताना पावसापासून या रेनकोटमुळे भिजावं लागणार नाही आणि यामुळे सुट्टी पडणार नाही याबाबत या कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केलं.तसेच आमदार पाटील यांचे आभार व्यक्त केले.