आम्हीच त्याला शोधून काढले! हार्दिकच्या घरवापसीनंतर नीता अंबानींचा आयपीएल फ्रँचायझींना टोला

Hardik Pandya Comeback In Mumbai Indians:  गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने अधिकृतपणे संघ सोडला आहे. आगामी आयपीएल हंगामासाठी (IPL 2024) तो त्याचा जुना संघ मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून अशी अफवा पसरली होती की हा स्टार ऑलराऊंडर आपली टीम गुजरात सोडून आपल्या जुन्या टीम मुंबईत परत येऊ शकतो.

पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण आता पंड्या आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणार असल्याची पुष्टी झाली आहे. हार्दिकचे मुंबईत परतण्याचे संघमालक आकाश अंबानी (Aakash Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांनी जोरदार स्वागत केले आहे तसेच अप्रत्यक्षपणे गुजरात संघाला टोमणा मारला आहे.

हार्दिक पांड्या मुंबईत परतल्यानंतर नीता अंबानी यांनी खेळाडूंचे स्वागत केले. त्या म्हणाला, “आम्ही हार्दिक मुंबईत परतल्यामुळे खूप आनंदी आहोत. त्याचे परत स्वागत करताना मला आनंद होत आहे. मुंबई इंडियन कुटुंबासोबत त्याला पुन्हा भेटून खूप आनंद झाला. हार्दिकने युवा संघाचा खेळाडू होण्यापासून भारताचा स्टार खेळाडू होण्यापर्यंतचा बराच पल्ला गाठला आहे आणि आम्ही त्याच्या आणि मुंबई इंडियन्ससोबतच्या भविष्याबद्दल उत्सुक आहोत!’

याशिवाय आकाश अंबानीनेही हार्दिक पांड्याचे मुंबईत घरी परतल्यावर त्याचे स्वागत केले आहे. तो म्हणाला- “मुंबई इंडियन्समध्ये हार्दिकला परत पाहून मला खूप आनंद झाला. ही एक आनंदी घरवापसी आहे. तो ज्या संघाकडून खेळतो त्याला तो उत्तम संतुलन देतो. हार्दिकचा MI कुटुंबासोबतचा पहिला कार्यकाळ खूप यशस्वी झाला आहे आणि आम्ही त्याच्याकडून मोठ्या गोष्टींची आशा करतो.’

महत्वाच्या बातम्या-

आगामी टी२० विश्वचषकात हार्दिक पंड्याकडे नेतृ्त्व देऊ नये, ‘हा’ खेळाडू असेल सर्वोत्तम पर्याय

अमिताभ बच्चन यांनी मुलीला भेट दिला ५६ कोटींचा बंगला, आता ‘बिग बी’ कुठे राहणार?

दादासमोर नाक उचलून…; रुपाली चाकणकरांचा कवितेतून सुप्रिया सुळेंवर निशाणा