‘दिल्ली ते गल्ली भाजपच्या जाहिरातींमध्ये होत असलेला फर्जीवाडा हा वारंवार समोर येत आहे’ 

मुंबई – पंतप्रधान मोदी यांनी नुकतेच नोएडा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन केले. यावेळी या विमानतळाच्या मास्टर प्लानचे म्हणून चीनच्या बिजिंगमधील विमानतळाचे फोटो भाजपच्या नेत्यांनी वापरले. भाजपने विकासाच्या नावावर चीनमधील फोटो चोरल्याबाबचत खुद्द चीनमधूनही यावर टीका करण्यात आली.

नुकतेच दिल्ली भाजपने झुग्गी सन्मान यात्रेच्या जाहीरातीसाठी सामान्य माणसाचा फोटो म्हणून तामिळचे प्रसिद्ध साहित्यिक, लेखक पेरुमल मुरुगन यांचा फोटो वापरुन त्यांना झोपडपट्टी रहिवासी दाखवलंय. याच मुद्द्यावरून आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने भाजपवर टीका केली आहे.

ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी सप्टेंबरमध्ये योगी सरकारने युपीमधील विकासाच्या नावाने एका वर्तमानपत्रात छापलेल्या भल्या मोठ्या जाहिरातीमध्ये पश्चिम बंगालच्या कोलकातामधील ब्रिजचा फोटो छापण्यात आला होता. टीका झाल्यानंतर वर्तमानपत्राला याबद्दल माफी मागायला लावली होती असा दावा राष्ट्रवादीने केला आहे.

काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने कृषी कायद्यांच्या जाहीरातीसाठी कृषी कायद्यांच्या विरोधातच आंदोलन करणारे शेतकरी हरप्रीत सिंह यांचा फोटो वापरला होता. महाराष्ट्रातही फडणवीस यांचे सरकार असताना मी लाभार्थी जाहीरातीसाठी शेतकऱ्यांचे फोटो त्यांच्या नकळत छापण्यात आले होते असं राष्ट्रवादीने म्हटले आहे.

एकूणच जाहिरातींमध्ये विकासाची चोरी करून जनतेची दिशाभूल करण्याचे तंत्र भाजप राबवत आहे. विकासाची रट लावणाऱ्या भाजपचा विकास हा दुसऱ्या राज्यात किंवा इतर देशात जन्माला आलेला असतो, हे आता दिसून आलेय. दिल्ली ते गल्ली भाजपच्या जाहिरातींमध्ये होत असलेला फर्जीवाडा हा वारंवार समोर येत आहे अशी टीका देखील राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे.

https://youtu.be/FkhUTw1OjTM

Previous Post

ग्राम विद्युत व्यवस्थापकांना मोठा दिलासा; मानधनात २ हजार रुपयाची वाढ

Next Post

महापौर पेडणेकरांच्या दालनातून टेंडरच्या फायली गायब, भाजप करणार ACBकडे तक्रार

Related Posts
दोन जुन्या मित्रांची झाली मध्यरात्री भेट; धनंजय मुंडे - देवेंद्र फडणवीसांच्या भेटीने राजकीय चर्चांना आले उधाण

दोन जुन्या मित्रांची झाली मध्यरात्री भेट; धनंजय मुंडे – देवेंद्र फडणवीसांच्या भेटीने राजकीय चर्चांना आले उधाण

मुंबई – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचा तर उपमुख्यमंत्री म्हणून भाजपा नेते देवेंद्र फडणवीस…
Read More
IND vs NZ सेमीफायनल सामन्यापूर्वी ICC केलेली घोषणा ऐकून भारतीय चाहते आनंदाने उड्या मारतील

IND vs NZ सेमीफायनल सामन्यापूर्वी ICC केलेली घोषणा ऐकून भारतीय चाहते आनंदाने उड्या मारतील

IND vs NZ World Cup 2023: आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 मधील लीग टप्प्यातील सामने संपले आहेत. आता उपांत्य…
Read More
५० रुपयांमध्ये शिवप्रेमींना पाहता येणार शिवसृष्टी; पुन्हा अनुभवता येणार शिवकाळ

५० रुपयांमध्ये शिवप्रेमींना पाहता येणार शिवसृष्टी; पुन्हा अनुभवता येणार शिवकाळ

पुणे  | आशियातील सर्वांत भव्य ऐतिहासिक थीम पार्क असलेल्या आणि आंबेगाव ब्रुद्रुक येथे साकारत असलेल्या शिवसृष्टीला (ShivShrishti) पुण्यातील…
Read More