महादेव जानकर पुन्हा सक्रिय, केली मोठी घोषणा !

पुणे : दिनांक 5 अॉगस्ट 2022 रोजी राष्ट्रीय समाज पक्षातर्फे माजी मंत्री महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथील जंतर- मंतर मैदानावर संपूर्ण देश पातळीवरील ओबीसी समाज एक दिवसाचे धरणे आंदोलन करणार आहे. अशी माहिती, राष्ट्रीय समाज पक्षाचे पुणे शहराध्यक्ष बालाजी पवार यांनी दिली आहे.

काय आहेत प्रमुख मागण्या ?

1) जातनिहाय जनगणना करणे

2) ओबीसी  आरक्षण कायम करणे

3) नॉन क्रिमीलिअरची अट रद्द करणे

4) 50 टक्के सिलींग हटविणे

5) सार्वजनिक संस्थामध्ये संपूर्ण आरक्षण लागू करणे

6) न्याय व्यवस्था, केंद्रीय सार्वजनिक शैक्षणिक संस्थांमध्ये संपू्र्ण आरक्षण लागू करणे

7) शेती, धान्य मालाला हमीभावाने खरेदीची हमी देणे

8) महागाई थांबविण्यासाठी ठोस पाऊल उचलणे

9) संपुर्ण शिक्षण मोफत करणे

10) मोफत अरोग्य सुविधा पुरविणे

दरम्यान या पत्रकार परिषदेला बालाजी दादा पवार (शहर अध्यक्ष ), कविता जावळे (ज़िल्हा अध्यक्ष महिला ), प्रसाद कोळेकर, राजेश लवटे (सचिव ), वैजनाथ स्वामी (संपर्क प्रमुख ), नारायण यमगर (संघटक ), बिरुदेव अनुसे (मीडिया प्रमुख ), तुषार तामखेडे (वॉर्ड अध्यक्ष ) उपस्थिती होते.