Vinayak Mete Death : विनायक मेटेंच्या ड्रायव्हरकडून समाधानकारक उत्तरं मिळाली नाहीत ?

Mumbai – शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete Death) यांचं नुकतेच पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर अपघाती निधन झालं. दरम्यान, आता विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूवर पत्नी ज्योती मेटे यांच्यासह अनेकांनी संशय व्यक्त केला आहे. यातच आता आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे.

पोलिसांकडून मेटे यांच्या कारच्या ड्रायव्हरला ताब्यात घेण्यात आले होते. रायगड पोलिसांनी ड्रायव्हर एकनाथ कदम (Eknath Kadam) याची चौकशी केली. मात्र यात त्याने समाधानकारक उत्तरे दिले नसल्याचे आढळून आले आहे. टीव्ही9 च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता विनायक मेटेंचा ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड या दोघांचेही फोन रेकॉर्ड तपासले जाणार आहेत. ज्या आयशरने मेटेंच्या गाडीला धडक दिली, त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोन्ही ड्रायव्हरची समोरासमोर बसवून चौकशी केली जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेटे यांच्या ड्रायव्हरनी पोलिसांच्या तपासाला समाधानकारक उत्तरं दिली नाहीत. त्यामुळे टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासणार आहेत. प्रवासादरम्यान, ड्रायव्हर, बॉडीगार्ड आणि विनायक मेटे यांना कुणाचे फोन आले होते, याचाही तपास पोलीस करणार आहेत. मेटे यांच्या कॉल्सचा डाटा पोलीस तपासणार आहेत. तसेच घटनेच्या वेळी ये-जा करणाऱ्या गाड्यांचाही तपास केला जाईल, अशी माहिती हाती आली आहे.