Ravi Kishan | “रवी किशन माझे पती”; निवडणुकीपूर्वी भाजप खासदार वादाच्या भोवऱ्यात; मुलगीही आली समोर

भोजपुरी अभिनेता आणि गोरखपूरचे भाजप खासदार रवी किशन (Ravi Kishan) अडचणीत सापडले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी ते मोठ्या वादात अडकू शकतात. एका महिलेने दावा केला आहे की ती रवी किशनची पत्नी असून दोघांना एक मुलगी आहे. अपर्णा ठाकूर असे या महिलेचे नाव असून ती भाजप खासदाराकडे मुलगी दत्तक घेण्याची मागणी करत आहे. यासोबतच तिने योगी आदित्यनाथ यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे.

अपर्णाने सोमवारी लखनऊमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. ज्यामध्ये तिने सांगितले की ती रवि किशनची (Ravi Kishan) पत्नी आहे आणि दोघांचे लग्न मुंबईत 1996 मध्ये झाले होते, ज्यामध्ये त्यांचे दोन्ही कुटुंबीय आणि खास मित्रही उपस्थित होते. अपर्णा सांगते की, दोघांनाही एक मुलगी आहे. रवी किशनने तिला सामाजिकरित्या स्वीकारावे अशी तिची इच्छा आहे. रवी किशन यांनी तसे न केल्यास न्यायासाठी न्यायालयात धाव घेणार असल्याचे महिलेने म्हटले आहे.

या कॉन्फरन्समध्ये महिलेची मुलगी देखील उपस्थित होती आणि तिने असा दावाही केला आहे की, रवी तिचे वडील आहेत आणि त्यांना भेटायलाही यायचे. अपर्णाच्या मुलीने सांगितले की, तिला वडिलांचे प्रेम कधीच मिळाले नाही, रवि किशन तिला भेटायला घरी जायचे आणि काही वेळाने परत जायचे, ते तिच्यासोबत राहिले नाही. ती म्हणाली, “मी त्यांच्याशी अनेकदा बोलले पण त्यांनी मला कधीच मदत केली नाही, मागच्या वेळी मला 10 हजारांची गरज होती, मी पैसे मागितले पण त्यांनी मला पैसे दिले नाहीत.” तिने सांगितले की तिला हिरोईन बनायचे होते, पण रवी किशनने तिला मदत केली नाही. तिने लारा दत्तासोबत एका चित्रपटात काम केले आहे.

अपर्णाचा दावा
अपर्णाने सांगितले की, 1995 मध्ये पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना रवी किशन यांच्याशी तिची भेट झाली. वर्षभरानंतर दोघांचे लग्न झाले. अपर्णा म्हणते की रवी किशन अजूनही तिच्या संपर्कात आहे, परंतु हे नाते आणि त्यांची मुलगी सार्वजनिकपणे स्वीकारू इच्छित नाही.

या महिलेचा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र, अभिनेता आणि राजकारणी रवी किशन यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. अपर्णा यांच्याकडे त्यांच्या मुलीचा डीएनए अहवाल असून, ती घेऊन ती न्यायालयात जाणार असल्याचा दावा चित्रपट अभिनेता कमाल राशिद खान उर्फ ​​केआरकेने केला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Mohite Patil | “मोहिते पाटील स्वार्थी, त्यांना विनाशकाले विपरीत बुद्धी सुचली”, अजितदादांच्या नेत्याची जहरी टीका

Sharad Pawar : शरद पवारांची सारवासारव; सुनेत्रा पवारांच्या बाबत केलेल्या वक्तव्याबाबत म्हणाले…

Sunetra Pawar | रखरखत्या उन्हातही सुनेत्रा वहिनींच्या प्रचाराला मतदारांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद, धायरीत जंगी स्वागत