तुम्ही हिंदुत्व सोडलं की नाही हे वारंवार सांगण्याची गरज नाही – दानवे

मुंबई – गेल्या काही महिन्यांपासून सुरू असणाऱ्या आरोप प्रत्यारोपांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) काय उत्तर देणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. मुंबईत पार पडलेल्या सभेत त्यांनी अपेक्षेप्रमाणे आपल्या भाषणातून शिवसैनिकांचा(Shivsainik) उत्साह वाढवण्याचा प्रयत्न तर केलाच सोबतच ठाकरे यांनी भाजपाचे हिंदुत्व (Hindutva) , केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर (Misuse of central systems) त्याचबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (Leader of Opposition Devendra Fadnavis and MNS chief Raj Thackeray) यांचा समाचार घेतला.

दरम्यान, या सभेवर सत्ताधारी आणि विरोधकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. या सभेमध्ये भाजपवर(Bjp) झालेल्या टीकेनंतर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे(Raosaheb Danave) यांनी शिवसेनेवर पलटवार केला. राज्यातील जनतेला या सभेबद्दल उत्सुकता होती. मुख्यमंत्र्यांच्या सभेकडे सर्वजण डोळे लावून बसले होते, मात्र सर्वांची निराशा झाली आहे, अशी टीका दानवेंनी केली.

आम्ही काय करत आहोत, काय करणार आहे, राज्यातील जनतेची काय स्थिती आहे, हे न सांगता,राज्यातील जनतेला दिलासा न देता केवळ उद्धव ठाकरे यांनी भाजपवर तोंडसुख घेतलं. तुम्ही हिंदुत्व सोडलं की नाही हे वारंवार सांगण्याची गरज नाही, असं दानवे म्हणाले.