मुख्यमंत्र्यांची अवस्था शोलेमधल्या आसरानीसारखी आहे – देशपांडे 

 मुंबई : राज्यातील विरोधक हिंदुत्वाच्या (Hindutva)  मुद्द्यामुळे वारंवार शिवसेनेला (Shivsena) खिंडीत गाठत असल्याचे चित्र असून हा मुद्दा किती कळीचा आहे याचा आता प्रत्यय येत आहे. आज  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी शिवसेना प्रवक्त्यांची बैठक (Meeting of Shiv Sena spokesperson) बोलावली होती. त्यामध्ये त्यांनी आता शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेण्याविषयी सूचना दिल्या आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे आणि भाजपवर तुटून पडा असा आदेश दिला आहे.मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) तसेच भाजपकडून सातत्याने होणाऱ्या टीकेला आता जशास तसे उत्तर देण्याची भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतल्याचं समजतंय. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेच्या प्रवक्त्यांना भाजप आणि मनसेवर तुटून पडण्याचा आदेश देण्यात आला आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एबीपी माझाशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. “मुख्यमंत्र्यांची अवस्था शोलेमधल्या आसरानीसारखी आहे. अर्धे मनसेवर तुटून पडा, अर्धे भाजपावर तुटून पडा आणि आम्ही घऱात बसतो अशी अवस्था आहे,” असा टोला त्यांनी लगावला आहे.