अर्जुन कपूरच्या बहिणीने दिली प्रेमाची कबुली, अंशुला कपूरची बॉयफ्रेंडसोबत रोमँटिक पोस्ट

अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) याची बहीण अंशुला कपूर (Anshula Kapoor) सध्या सतत चर्चेत असते. ती चित्रपटांपासून दूर असली तरी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अंशुला अनेकदा तिचे फोटो फॅन्ससोबत शेअर करत असते. अलीकडेच तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर असा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामुळे तिची सर्वत्र चर्चा होत आहे.

अंशुलाने रोहनसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे
गेल्या अनेक दिवसांपासून अंशुला तिचा खास मित्र रोहन ठक्करला (Rohan Thakkar) डेट करत असल्याची चर्चा होती. आता त्यांनी आपल्या नवीन पोस्टद्वारे याची पुष्टी केली आहे. अंशुलाने शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती पाण्यात रोहनसोबत रोमँटिक होताना दिसत आहे. या फोटोसोबत अंशुलाने कॅप्शनमध्ये 366 लिहिले आहे, याचा अर्थ दोघांना रिलेशनशिपमध्ये राहून एक वर्ष पूर्ण झाले आहे.

हे फोटो मालदीवमधील आहेत, जिथे दोघे पूलमध्ये एकमेकांच्या प्रेमात बुडालेले दिसत आहेत. अंशुलाच्या या पोस्टवर तिच्या बहिणींच्या प्रतिक्रियाही समोर आल्या आहेत. या पोस्टच्या कमेंटमध्ये जान्हवी कपूर आणि खुशीने हार्ट इमोजी पाठवले आहेत.

अंशुला ही मोना कपूरची मुलगी आहे
यापूर्वी अंशुला तिच्या वजनामुळे खूप ट्रोल होत असायची, पण आता ती पूर्णपणे फिट झाली आहे. ती बोनी कपूर आणि मोना कपूर यांची मुलगी आहे. अंशुला ही बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरची धाकटी बहीण आहे. जान्हवी आणि खुशी कपूर या दोघी तिच्या सावत्र बहिणी आहेत. अभिनेत्री श्रीदेवीच्या मृत्यूनंतर चारही भावंडे एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसतात.