चिडचिड वाढली! वडिलांची जुनी वक्तव्ये ठरत आहेत प्रणिती शिंदे यांची डोकेदुखी

Praniti Shinde:- सोलापुरात कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात भाजपकडून आमदार राम सातपुते (Ram Satpute) हे मैदानात आहेत. सोलापुरातील लढाई आपण सहज जिंकू अशा अविर्भावात कॉंग्रेसचे नेते आणि स्वतः उमेदवार प्रणिती शिंदे या फिरत होत्या. मात्र भाजपने तिरकी चाल खेळत झुंजार आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर केली आणि या लढतीमध्ये खरी रंगत आणली.

दरम्यान, आता हि लढाई तुल्यबळ होणार असे चित्र असताना प्रणिती शिंदे यांचे वडील माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी या आधी केलेली वक्तव्ये ही कॉंग्रेस आणि प्रणिती शिंदे यांच्यासाठी डोकेदुखी ठरत आहेत. मुख्यतः सुशीलकुमार शिंदे यांनी हिंदू किंवा भगवा दहशतवादाबाबत केलेले वक्तव्य हे प्रणिती शिंदे यांना अडचणीत आणत आहे.

कॉंग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी मंदिरांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत. त्यावर विचारले असताना सुशीलकुमार शिंदे यांनी हिंदूंना भगवा दहशतवादी म्हटले होते आणि आता ते संत मंहतांना भेटत आहेत अशी टीका राम सातपुते यांनी शिंदे यांच्यावर केली आहे. विशेष म्हणजे भाजपकडून सातत्याने या विषयावरून टीका होत असल्याने प्रणिती शिंदे या देखील वैतागल्याचे दिसून येत आहे. या टीकेला उत्तर देताना त्यांची चिडचिड होत असल्याचे देखील दिसून येत आहे.

दरम्यान, सुसंस्कृत राजकारणाच्या गप्पा मारणाऱ्या प्रणिती शिंदे यांची हि चिडचिड आणि पातळी सोडून केलेली टीका बरेच काही सांगून जात असून भाजपकडून योग्य दिशेने प्रचार सुरु असल्याचे दिसत आहे. आता कॉंग्रेसची विचारधारा पुढे नेणाऱ्या आणि हिंदूंना भगवा दहशतवादी म्हणणाऱ्या सुशीलकुमार शिंदेंच्या कन्येला सोलापूरकर लोकसभेत पाठवणार का याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

शिवसेना शिंदे गटाने जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी, पाहा कोणाला मिळालं तिकीट?

Nana Patole | लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी लोकसभा निवडणुकीत एकजुटीने लढण्याची गरज

Prakash Ambedkar | ‘वंचितच्या पाठीत खंजीर खुपसला’! आंबडेकरांचा संजय राऊतांवर हल्लाबोल