राम सातपुते यांच्या रूपाने सोलापूरला मिळणार तरुण, तडफदार आणि व्हिजनरी खासदार?

Ram Satpute : लोकसभा निवडणूक २०२४ साठी महाविकास आघाडीने काँग्रेसच्या प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना उमेदवारी दिली आहे. प्रणिती यांनी सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा विजय मिळवलेला आहे. त्यामुळे त्यांना काट्याची टक्कर देण्यासाठी महायुतीतून तगडा उमेदवार मैदानात उतरवणे गरजेचे होते. भाजपकडून अनेकजण इच्छुक होते. मात्र भाजपाकडून युवा नेते राम सातपुते यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली.

राम सातपुते हे माळशिरसचे विद्यमान आमदार आहेत. तसेच ते भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्षही आहेत. त्यांनी कमी वयातच राजकीय क्षेत्रात आपली मुळे घट्ट रोवली आहेत. त्यामुळे राम सातपुतेच सोलापूरातून प्रणिती शिंदेंना तगडे आव्हान देऊ शकतील असा विश्वास दाखवत भाजपाने त्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे. सोलापूरातून पुन्हा एकदा भाजपाचा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज असलेले राम सातपुते नेमके कोण आहेत? ते आपण जाणून घेऊया…

कोण आहेत राम सातपते?
राम सातपुते यांनी विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात पाऊल टाकलं. अवघ्या ३४ वर्षांचे सातपुते हे संघातून तयार झालेले आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून वाढले तरूण नेते आहेत. मूळ बीड जिल्ह्यातील डोईठाण (ता. आष्टी) येथील रहिवासी असलेले सातपुते हे अ. भा. विद्यार्थी परिषदेचे प्रदेश मंत्री आणि भारतीय जनता युवा मोर्च्याचे प्रदेश उपाध्यक्षपद सांभाळत असताना मागील २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना माळशिरस राखीव मतदारसंघातून निवडून आणण्याची जबाबदारी ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यावर सोपविली होती.

ते देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे आहेत. त्यांचे भाषणकौशल्यही चांगले असून सोलापूरातील अनेक प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्यासारख्या उच्चशिक्षित आणि तरुण खासदाराची गरज आहे. त्यामुळे यंदाही सोलापूरातून भाजप विजयाची हॅट्रिक करणार, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

शिवसेना शिंदे गटाने जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी, पाहा कोणाला मिळालं तिकीट?

Nana Patole | लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी लोकसभा निवडणुकीत एकजुटीने लढण्याची गरज

Prakash Ambedkar | ‘वंचितच्या पाठीत खंजीर खुपसला’! आंबडेकरांचा संजय राऊतांवर हल्लाबोल