त्या तीन लोकांमध्ये खरा मुख्यमंत्री कोण हे आधी तपासले पाहिजे – आदित्य ठाकरे   

 Shiv Sena MLA Disqualification Case :  शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी ((Shiv Sena MLA Disqualification Case)  )  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar)  आज निकाल देणार आहेत. याप्रकरणी 34 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या, तसंच सव्वादोन लाख कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गटातील आमदारांचं भवितव्य या निकालावर ठरणार आहे.

शिवसेना ठाकरे गटाकडून व्हीप आदेश मोडल्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह 16 आमदारांवर अपात्रतेची याचिका दाखल केली. सुप्रीम कोर्टात जवळपास वर्षभराच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालात काही गोष्टी स्पष्ट करत विधानसभा अध्यक्षांना अपात्रतेचा सुनावणी घेऊन निकाल देण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर, आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज निकाल सुनावणार आहेत.  दरम्यान,  आमदार आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray)  शिवसेना आणि भाजपवर टीका केली आहे. राज्यात जे सत्तेत बसले आहेत त्या तीन लोकांमध्ये खरा मुख्यमंत्री कोण हे आधी तपासले पाहिजे. दोन वर्ष गद्दारीची आहे . हे सरकार गद्दारांचं आहे खोके सरकार आहे. मुख्यमंत्र्यांना वाटते 33 देशांनी त्यांची दखल घेतली परंतु 33 देशांनी त्यांची नाही तर गद्दाराची दखल घेतली आहे, असा टोला आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना ते पुढे म्हणाले,  ‘शिंदे आणि नार्वेकर यांची भेट भेणे योग्य नाही ती भेट म्हणजे न्यायमूर्ती आणि आरोपीनं भेटण्यासारखं आहे, हे जगजाहीर आहे. आजचा निर्णय घटनेनुसार असेल अशी आशा आहे. देशाच्या संविधानाप्रमाणे 40 गद्दार हे बाद झाले पाहिजे. पक्षासाठी नाही तर देशासाठी हा निकाल महत्तवाचा आहे, डॉ. बाबाासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिले आहे त्या संविधनाप्रमाणे गेले तर हे आमदार बाद झाले पाहिजे. जर निकाल वेगळा आला तर ते भाजपाचे वेगळे संविधान  आहे असे वाटेल.