शिंदे गटाचे आमदार १०० % अपात्र; जेष्ठ नेत्याच्या दाव्याने खळबळ

Bhaskar Jadhav on Shiv Sena MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी ( (Shiv Sena MLA Disqualification Case) ) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) आज निकाल देणार आहेत. याप्रकरणी 34 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या, तसंच सव्वादोन लाख कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गटातील आमदारांचं भवितव्य या निकालावर ठरणार आहे.

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र होतील, असा दावा केला आहे. विधानसभा अध्यक्षांनी नियमांनुसार, पक्षांतर्गत बंदी कायद्यानुसार,घटनेनूसार जर निर्णय दिला तर शिंदे गटाचे आमदार १०० % अपात्र होतील, असा दावा भास्कर जाधव यांनी केलाय.

काही चुकीचा निर्णय झाला तर देशाच्या लोकशाहीवर परिणाम करणारा निर्णय असू शकेल. भरत गोगावले नियमबाह्य आहेत. सर्व घटनात्मक पद आता मोडीत निघालेली आहेत. नियम कायदा पाळणारे हे लोक आहेत का? असा सवाल भास्कर जाधवांनी उपस्थित केलाय. आमचे आमदार अपात्र ठरण्याचा तीळमात्र कुठूनही, कायद्याने, नियमाने जरा सुद्धा संबंध नाही. पण तरीदेखील सर्व नियम आणि कायदे जर धाब्यावरच बसवायच ठरवलेय दिसतंय.अशी टीका देखील त्यांनी केली आहे.