राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा वापर करण्याचा अधिकार फक्त आम्हाला; शरद पवारांचा दावा

NCP Crisis: राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा वापर करण्याचा अधिकार फक्त आम्हालाच आहे. आज ७० लोकांनी माझ्या नावाचा प्रस्ताव दिला आहे. पक्ष आणि चिन्ह हे आपलंच असल्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विस्तारित कार्य समितीची आज दिल्लीतल्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये बैठक पार पडली त्यावेळी शरद पवार बोलत होते.

शरद पवार म्हणाले की, पक्षाचं चिन्ह त्यांना मिळेल असा त्यांचा दावा आहे. निवडणूक आयोगाचा (Election Commission) निर्णय काही आला तरी चिंता करण्याचं कारण नाही. पक्ष आणि चिन्ह वापरण्याचा अधिकार फक्त आम्हाला आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय आपल्या बाजूने लागेल. देशाचं राजकारण बदलत आहे. आज अनेक राज्यात भाजपाचं सरकार नाही. काही राज्यातील विरोधी पक्षाची सरकारं पाडून अनेक ठिकाणी भाजपने सत्ता स्थापन केली आहे.

शरद पवार पुढे म्हणाले, आपल्याच जुन्या सहकाऱ्यांनी आपल्याविरोधारात निवडणूक आयोगात तक्रार केली आहे. त्याचं उत्तर आज दिल्लीतील कार्यकारणीच्या बैठकीत झालेल्या ठरावाने दिलं आहे. ते लोक म्हणतात की तेच राष्ट्रवादी काँग्रेस आहेत. तालकटोरा येथे झालेल्या बैठकीतील राष्ट्रीय अध्यक्षाची निवडच चुकीची आहे. ते म्हणतात की निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना काहीच अधिकार नाहीत. यापुढे जाऊन ते म्हणतात की तेच राष्ट्रवादी काँग्रेसचे खरे अध्यक्ष आहेत पदाधिकारी आहेत आणि पक्षाचं नाव, पक्षचिन्ह याचा वापर करण्याचा अधिकार केवळ त्यांनाच आहे. आपल्याला नाही.

शरद पवार यावर सविस्तर बोलताना म्हणाले की, ८ लोकांना मंत्रिमंडळात सहभागी केलं. हे लोक मला भेटायला आले होते. तेव्हा त्यांनी म्हटलं की, आमच्या मागे ईडी लावली आहे. त्यामुळे आम्हाला बीजेपी सोबत जावं लागलं. तुम्ही याबाबत काहीतरी उपाययोजना करा असं अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांचं म्हणणं होते. काही इमानदार कार्यकर्ते होते. त्यापैकी एक अनिल देशमुख. त्यांनी पक्ष सोडला नाही असंही शरद पवार साहेब म्हणाले.

शरद पवार म्हणाले की, बंडखोरी करून बाहेर पडलेल्याची निवड ही चुकीची आहे. निवडणुकीची पद्धत कशी असावी हे मी त्यांना सांगितलं. जे आज म्हणतात की ही निवडणूक योग्य नव्हती. मात्र यावर त्यांच्या सह्या आहेत. आम्ही एकत्र बसलो चर्चा केली. जे लोक गेलेत ते म्हणतात की पक्ष आम्हाला मिळेल चिन्ह मिळेल. जे अजून व्हायचे आहे ते कसं सांगतात की हा निर्णय आमच्या बाजूने लागेल? मला कळत नाही हे असं कसं असू शकतं? असे प्रश्नही शरद शरद पवार साहेबांनी उपस्थित केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) रेल्वे उद्घाटन करायला जातात आणि त्यांची विरोधकांवर कुरघोडी करण्यास सुरूवात होते. भोपाळला गेल्यावर भाषण दिलं की राष्ट्रवादी पार्टी भ्रष्ट आहे. जर पार्टी भ्रष्ट आहे तर चौकशी करा आणि जर खरं असेल तर कारवाई करा. मात्र, ज्यांच्याविरोधात आरोप केला ते आज राज्य मंत्रिमंडळातच आहेत, असेही शरद पवार साहेब म्हणाले.

देशाचं वातावरण बदलतंय. केरळमध्ये भाजप नाही. तमिळनाडूमध्ये नाही. गोव्यात नव्हती. मात्र निवडून आलेले आमदार फोडून आणली. आंध्र प्रदेशात भाजप नाही. महाराष्ट्रात भाजप नव्हती. मध्य प्रदेशमध्ये नव्हती. मात्र लोक तोडले. मग सरकार आणलं गेलं. राजस्थानमध्ये नाही. दिल्लीत नाही पश्चिम बंगालमध्ये नाही. मग आहे कुठे? छोट्या छोट्या राज्यात भाजप आहे. देशात मूड बदलत आहे. आपण सगळ्यांनी एकत्रित काम केलं पाहिजे असेही शरद पवार साहेबांनी सांगितले आहे.

महात्मा गांधींचं नाव का घेता? तर त्यांनी सत्य, अहिंसा मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं काम केलं. भाजपने निवडून आणलेले सरकार तोडले. त्यांना कोण खरं बोलायला तयार नाही. मणिपूरची परिस्थित पाहून लाज वाटते. यावर कधी निर्णय घ्यावा वाटला नाही. दुकानं जाळली, घरं जाळली, तिथं जाऊन आधार देणं प्रधानमंत्रींच काम नाही ? ही परिस्थित तिथे आहे असं शरद पवार साहेब म्हणाले.

एजन्सीचा वापर सुरुय. काही दिवसांपूर्वी नावच माहीत नव्हतं. ईडीचं नाव माहीत नव्हतं. आजकाल भांडण झालं तर म्हणतात ईडी लावेन. दिल्लीतील राज्यसभा खासदारच्या घरावर छापा टाकला. आज सकाळी कोणी सांगितलं की इतर राज्यातही सुरु आहे. ममतांच्या सहकार्यावर ही सुरु आहे असा दावा शरद पवार साहेबांनी केला आहे.

अनिल देशमुख यांना अटक केली. त्यांना १३ महिने जेलमध्ये ठेवलं. काही नव्हतं मुंबई उच्च न्यायालयाने सोडून दिलं. शिवसेनेच्या संजय राऊत यांना अटक केली. त्यांनाही सत्र न्यायालयाने सोडलं. मोदींच्या विरोधात लिहितात म्हणून कारवाई केली. ईडी आणि सीबीआयचा राजकीय वापर केला जातोय असा आरोप शरद पवार साहेबांनी केला.

भाजप राजकीय पक्षांच्या विरोधात कारवाई करते. पंतप्रधान अशा कामांना सपोर्ट करतात. मात्र पंतप्रधान पदाची जबाबदारी आणि राजकीय जबाबदारी वेगळी आहे. मी अनेकदा पंतप्रधान यांच्या बैठकांना गेलोय. आधीचे पंतप्रधान आणि आताच्या पीएम मध्ये फरक आहे. आधीचे पंतप्रधान विकास कामांच्या उद्घाटनाला गेल्यावर कधी राजकीय बोलत नव्हते. विरोधी पक्षाला शिव्या देत नव्हते असा टोला देखील शरद पवारनी लगावला.

भाजपने निवडणूक चिन्ह बदललं पाहिजे. लोक म्हणतात त्यांनी चिन्ह बदलून वाशिंग मशीन करावं असं लोक महाराष्टात म्हणतात. ईडी, सीबीआय आयटी यांचा गैरवापर केला जातोय. एका मीडिया हाऊसवर छापेमारी केली. त्यांच्या विरोधात तक्रार केली की चीनला मदत केली. कालची कारवाई ठीक नाही. ती कारवाई चुकीची आहे. त्यांनी भाजपची स्थिती मांडली होती. देशात बदल होईल असेही शरद पवार यावेळी बोलताना म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

राहुलजींच्या केसाला धक्का लावला तर ‘सळो की पळो करुन सोडू’ – Nana Patole

खलिस्तानचा आणि चीनचा बागुलबुवा येत्या निवडणुकीत दाखवला जाणार आहे : P. Sainath

मुख्यमंत्री Eknath Shinde यांनी अखेर घेतला राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा