Manoj Jarange | ‘मी पुरा पाणउतारा करत असतो’, मनोज जरांगेंचे नारायण राणेंना सणसणीत प्रत्युत्तर

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) आणि केंद्रिय मंत्री नारायण राणे यांच्यातील वाढ दिवसेंदिवस उफाळतच चालला आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे. जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे. सगे सोयरे शब्दाच्या अमंलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. यादरम्यान नारायण राणे (Narayan Rane) यांनी मनोज जरांगे यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

मनोज जरांगे पाटील याच्‍या डोक्‍यावर परिणाम झाल्‍यामळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे. त्‍याला मी मराठयांचा नेता मानत नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्‍ट्रात फिरु देणार नाही अशी बेताल बडबड त्याने केली. त्‍याने आता मर्यादा ओलांडली आहे. पंतप्रधान जेंव्‍हा महाराष्‍ट्रात येतील त्‍यावेळी जागेवरुन हलून दाखव ! तुला असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल. आपली औकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून राहून नाटके करावीत !, अशा तिखट शब्दांत नारायण राणे यांनी मनोज जरांगेंवर टीका केली आहे.

आता मनोज जरांगेंनी राणेंना प्रत्युत्तर देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मला आणखीही एवढ्या वेळेस त्यांना सुट्टी द्यायची आहे. माझी निलेश राणेंना विनंती आहे की, त्यांनी नारायण राणेंना थांबवावं. कारण मलाही काही मर्यादा आहेत. मी कचाट्यात आलं की धुवून काढणार आहे. नारायण राणे यांच्याबद्दल माझ्या तोंडातून ब्र शब्द आहे का?, असा सवालही जरांगे यांनी केला. तसेच, मोदीसाहेबांनाही ओबीसी असल्याचा स्वाभिमान आहे. मग, आम्ही तर मराठ्यांसाठी मागतोय, मग तुम्ही आमच्याकडून बोलायला पाहिजे, तुम्हाला आमच्या बाजुने बोलायला स्वाभिमान पाहिजे, असे म्हणत मनोज जरांगे यांनी नारायण राणेंच्या टीकेवर प्रतिक्रिया दिली.

निलेश राणेंनी मोठ्या साहेबांना माझी शेवटची विनंती आहे. दुसऱ्यांदा मी सोडत नसतो, कोण आहे, काय आहे, आणि केवढ्याचा आहे हेही मी बघणार नाही. मी त्यांचं वय आहे, त्यांचा आदर करतो, मोठ्या किमतीचा माणूस आहे. पण, माझ्या भावना समजत असतील तर समजून घ्या, नाहीतर मी पुरा पाणउतारा करत असतो, सोडतच नसतो. त्यांचं आत्तापर्यंत ५ वेळा झालंय, आम्ही त्यांना ५ वेळा सांगितलंय की तुम्ही बोलू नका. पण, आता ऐकून आपली घ्यायची क्षमता नाही. ते जर मला चॅलेंज देत असतील तर मीपण लय नमुना आहे, मीही मराठाच आहे, असेही जरांगे यांनी म्हटले.

महत्वाच्या बातम्या

NCP MLA Disqualification : राष्ट्रवादी अजितदादांचीच, शरद पवार यांना मोठा धक्का

Jagdish Mulik | पुणे लोकसभा निवडणुकीसाठी जगदीश मुळीकांच्या उमेदवारीची शक्यता वाढली

Surya Ghar Yojana | मोफत वीज योजनेसाठी नोंदणी झाली सुरू, असा करू शकता अर्ज