NCP Crisis: शरद पवार आपल्या मर्जीनुसार पक्ष चालवतात; अजित पवार गटाचा गंभीर आरोप

NCP Crisis: भारतीय निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हावरील दाव्यांबाबतच्या याचिकांवर सुनावणी सुरू आहे. राष्ट्रवादीच्या एका गटाचे नेतृत्व जेष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) आणि दुसऱ्या गटाचे नेतृत्व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) करत आहेत. दोन्ही गटांनी आपल्या याचिकेत वेगवेगळे दावे आणि एकमेकांवर आरोप केले आहेत.

दरम्यान अजित पवार यांनी शरद पवारांवर गंभीर आरोप करताना पवार हे मनमानी कारभार करतात असे म्हटले आहे. अजित पवार गटाने आयोगात गंभीर आरोप केला आहे. शरद पवार आपल्या मर्जीनुसार पक्ष चालवतात, असा आरोप अजित पवार गटाने यावेळी केला. जयंत पाटील (Jayant Patil) यांची राज्य प्रदेशाध्यक्षपदावरील नियुक्ती कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी करण्यात आली, असेही अजित पवार गटाने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

राहुलजींच्या केसाला धक्का लावला तर ‘सळो की पळो करुन सोडू’ – Nana Patole

खलिस्तानचा आणि चीनचा बागुलबुवा येत्या निवडणुकीत दाखवला जाणार आहे : P. Sainath

मुख्यमंत्री Eknath Shinde यांनी अखेर घेतला राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा