‘उद्याच्या ‘उत्तर- सभे’त मनसेच्या विरोधकांना त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील! फक्त थोडीशी वाट पहा’

मुंबई – काल अमरावतीमध्ये बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी देशातील एकंदरीत वातावरणावर भाष्य केले आहे. आज आपल्याला एका वेगळ्या परिस्थितीतून जावं लागत आहे. देशात एक वेगळं जातीयवादी वातावरण निर्माण केले जात आहे. असं ते म्हणाले.

हिंदू – मुस्लीम (Hindu -Muslim) करता येईल का? दलित – हिंदू करता येईल का? असं सतत काही ना काही चालू आहे. ज्या समाजातील घटकांचा विश्वास आहे त्या सर्व घटकांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रवादी केव्हाही या गोष्टींना पाठिंबा देणार नाही. जो जातीयवाद करतो जो धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करतोय अशांची संगत राष्ट्रवादी कधीही करणार नाही असा देखील दावा पवारांनी केला आहे.

दरम्यान, आता या मुद्यावरून राजकीय वातावरण पुन्हा तापले असून  मनसेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे (Kirtikumar Shinde)  यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले,  जातीयवाद आणि जमातवाद यांमध्ये नेमका काय फरक आहे तो प्रबोधनकार ठाकरे यांनी फार पूर्वीच सांगितला आहे. राहिला प्रश्न शरद पवारांनी मांडलेल्या मताचा; त्यावरचे उत्तर मिळायला आता फक्त काही तासच उरले आहेत. राजसाहेब ठाकरे यांच्या उद्याच्या ‘उत्तर- सभे’त मनसेच्या विरोधकांना त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील! फक्त थोडीशी वाट पहा.असं ते म्हणाले.