“…नाहीतर डोळ्याला झंडूबाम लावून रडण्याची वेळ येते”, कदमांच्या टीकेनंतर अजितदादा गटाचा पलटवार

Ramdas Kadam Vs Ajit Pawar मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असताना अचानक उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांना डेंग्यू झाल्याची बातमी समोर आली. अजित पवारांच्या या आजारपणाचे विविध राजकीय अर्थ काढले जात आहेत. आता शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनीही अजित पवारांवर टीकास्र सोडलं आहे.

मराठा समाज जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अंगावर आला, तेव्हा अजित पवारांना डेंग्यू झाला, अशी उपरोधिक टीका रामदास कदम यांनी केली. त्याचबरोबर सत्ताधारी पक्षातील आमदार सरकारविरोधात आंदोलन कसं काय करू शकतात, हेच मला समजत नाही, असं वक्तव्य रामदास कदम यांनी केलं.

दरम्यान, या टीकेला अजित पवार गटाने देखील प्रत्युत्तर दिले आहे. अजित पवार गटाचे नेते सूरज चव्हाण म्हणाले,अजित पवार हे रामदास कदमांच्या आकलनाबाहेरचे नेते आहेत. त्यामुळे त्यांनी जेवढं आकलन आहे, तेवढंच वक्तव्य करावं. नाहीतर डोळ्याला झंडूबाम लावून रडण्याची वेळ येते, असं प्रत्युत्तर सूरज चव्हाण यांनी दिलं आहे.

चव्हाण म्हणाले, अजित पवार हे आपल्या आकलनाबाहेरचे नेते आहेत, हे रामदास कदमांनी आधी लक्षात ठेवावं. एखाद्या व्यक्तीच्या आजारपणावर बोलू नये, यातून आपले संस्कार दिसतात. पवार कुटुंब किंवा अजित पवार हे आपल्या आकलनाबाहेरचे विषय आहेत. त्यामुळे आपलं जेवढं आकलन आहे, तेवढंच आपण वक्तव्य करावं. नाहीतर डोळ्याला झंडूबाम लावून रडण्याची वेळ येते.

महत्वाच्या बातम्या-

Apple लवकरच OLED डिस्प्लेसह IPad Air आणि IPad Pro चे दोन नवीन मॉडेल लॉन्च करणार?

Latur News : महाराष्ट्राची मान शरमेने झुकली; सत्तरी ओलांडलेल्या मौलानाने केले मोठे कांड

पाकिस्तानी क्रिकेटर अब्दुल रज्जाकने ऐश्वर्यावर केली अश्लील टिप्पणी केली,म्हणाला,…