सनी, राखी, उर्फी नावापुरते कपडे घालतात ते चालते मग अंगभर कपडे घातलेल्या गौतमीला विरोध का?

Minakshi Shinde support Gautami Patil: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात दिवाळी पहाटच्या (Diwali Pahat) कार्यक्रमानिमित्त गौतमी पाटीलचा डान्स कार्यक्रम झाला. दरम्यान, या कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद पाहून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे काहीसे अस्वस्थ झाल्याचे दिसत आहेत. यावरून ठाकरे गटाकडून सुषमा अंधारे यांनी तसेच जितेंद्र आव्हाड यांनीही शिंदे गटावर आगपाखड केली.

दरम्यान, आता यावरून या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या ठाण्याच्या माजी महापौर आणि शिंदे गटाच्या नेत्या मिनाक्षी शिंदे (Minakshi Shinde) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी काल (१४ नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन सुषमा अंधारे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली.

त्या म्हणाल्या की, गणपती, जन्माष्टमीला प्रत्येक कलाकाराला व्यासपीठावर बोलावून नाचवलं जातं. तेव्हा कोणीही आक्षेप घेत नाही. गौतमीने अंगभर कपडे घालून माझ्या व्यासपीठावर नृत्य केलं, तिच्याबाबत आक्षेप नोंदवला. पण सनी लिओनी, राखी सावंत, उर्फी जावेद (Sunny Leone, Rakhi Sawant, Urfi Javed) भारत-पाकिस्तान मॅचदरम्यान नावापुरते कपडे घालतात अशा लोकांचा महाराष्ट्रात सन्मान होतो आणि अंगभर कपडे घातलेल्या गौतमीला विरोध होतो. जे नेते या गोष्टीवर बरळतात त्यांची कीव येते. लोकसंस्कृतीचा जागर करणाऱ्या महिलेवर टीका होतेय. ती गरीब घरातून आली आहे आणि इतर जरा श्रीमंत घरातील आहेत त्यामुळे हा भेदभाव सुरू आहे.

मुंब्र्यातून आम्ही काहींना पळवून लावलं. पण, मिनाक्षी शिंदेच्या कार्यक्रमात अलोट गर्दी पाहून आव्हाडांच्या पोटात दुखलं असेल. मी गौतमी पाटीलचे कार्यक्रम पाहिलेत. तिने प्रत्येक कार्यक्रमात अंगभर कपडे घातले होते. दिवाळी पहाटच्या दिवशी सकाळी ५.३० वाजल्यापासून सगळे उभे होते. ६५ वर्षीय आजीही तिथे उपस्थित होत्या. गौतमीच्या क्रेझमुळे आव्हाडांच्या पोटात दुखलं असेल, असंही मिनाक्षी शिंदे म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या-

Apple लवकरच OLED डिस्प्लेसह IPad Air आणि IPad Pro चे दोन नवीन मॉडेल लॉन्च करणार?

Latur News : महाराष्ट्राची मान शरमेने झुकली; सत्तरी ओलांडलेल्या मौलानाने केले मोठे कांड

पाकिस्तानी क्रिकेटर अब्दुल रज्जाकने ऐश्वर्यावर केली अश्लील टिप्पणी केली,म्हणाला,…