आमचे देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंपेक्षा हजार पटीने देखणे आहेत – Narayan Rane 

 Narayan Rane – शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) अलिकडच्या अनेक जाहीर सभांमधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत असल्याचं पाहायला मिळालं आहे. कधी ‘कलंक’, तर कधी ‘टरबूज’ असा उल्लेख करत ते अप्रत्यक्षपणे फडणवीसांवर टीका करत आहेत. उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात जळगावात सभा जाहीर सभा घेतली होती. या सभेतही त्यांनी फडणवीसांना लक्ष्य केलं.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या टीकेला केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. नारायण राणे उद्धव ठाकरे यांना उद्देशून म्हणाले, काय नाव ठेवता हो तुम्ही आमच्या देवेंद फडणवीसांना? काय नाव वापरता? त्याचा अर्थ तरी कळतो का? टरबुजात कोणते व्हिटॅमिन्स आहेत? टरबूज खाल्ला तर गोड लागतो का कडू लागतो माहितीय का?

नारायण राणे म्हणाले, त्यांनी (उद्धव ठाकरे) ते नाव ठेवलं. पण मला वाटतं, आमचे देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंपेक्षा हजार पटीने देखणे आहेत. वैचारिक, बौद्धिक, सामाजिक आणि शैक्षणिक अशा सगळ्या क्षेत्रांचा त्यांचा अभ्यास आहे.मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवरूनही केली टीका अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणासाठी काहीही न करणारे उद्धव ठाकरे सध्या आरक्षण  विषयावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पातळी  सोडून टीका करत आहेत . उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला आपण स्वतः  त्याच भाषेत उत्तर देऊ ,  नारायण राणे यांनी गुरूवारी सांगितले.

स्वत: अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना अडीच दिवसही मंत्रालयात न जाणा-या उद्धव ठाकरेंना, मराठा समाजाला आरक्षण देण्यात काही रस नव्हता तसेच तत्कालिन आघाडी सरकार मराठा आरक्षणाबाबत अत्यंत निष्क्रीय होते अशी टीका राणे यांनी केली.

https://youtu.be/igs_KEHGv_g?si=93eBUKyMvxt2A_6b

महत्त्वाच्या बातम्या-

भारतीय सैनिक अरुणाचल प्रदेश व पंजाबसह सीमावर्ती भागात करणार ‘दगडूशेठ’ गणपतीची प्रतिष्ठापना

Rahul Gandhi की Arvind Kejriwal! 2024 साठी विरोधकांचा चेहरा कोण?

Loksabha Election : पुणे लोकसभेच्या भाजपा समन्वयकपदी श्रीनाथ भिमाले !