P.N.Patil | काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांचे निधन; वडेट्टीवार म्हणाले, “काँग्रेसचे निष्ठावान नेतृत्व आम्ही गमावले”

कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे आधारवड, विधिमंडळातील माझे जेष्ठ सहकारी आमदार पी. एन. पाटील (P.N.Patil) यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाचे आक्रमक आणि निष्ठावान नेतृत्व आज आम्ही गमावले आहे. पी. एन. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली करतो. अशा शब्दात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी आमदार पी. एन. पाटील यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

वडेट्टीवार आपल्या शोक संदेशात म्हणतात कि, काँग्रेस पक्षाचे निष्ठावान नेते, स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांचे खंदे समर्थक म्हणून आमदार पी. एन पाटील (P.N.Patil) यांची ओळख होती. शिक्षण, सहकार, कृषी क्षेत्राची त्यांना उत्तम जाण होती. कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील होते. कोल्हापूर लोकसभा उमेदवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा आमदार पी. एन. पाटील यांनी झंझावाती प्रचार केला. त्यांनी काँग्रेस पक्षासाठी दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही. त्यांच्या निधनाने पाटील कुटुंबीय, पक्षाचे कार्यकर्ते, त्यांचा मित्र परिवार दुःखात आहेत. या दुःखातून सावरण्याचे बळ सर्वांना मिळो हीच ईश्वचरणी प्रार्थना.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप