वाजपेयी पेट्रोल दरवाढ झाल्यावर बैलगाडीतून संसदेत गेले होते तो संवेदनशील भाजप कुठे आहे?

मुंबई – गेल्या काही महिन्यांपासून सुरू असणाऱ्या आरोप प्रत्यारोपांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) काय उत्तर देणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. मुंबईत पार पडलेल्या सभेत त्यांनी अपेक्षेप्रमाणे आपल्या भाषणातून शिवसैनिकांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न तर केलाच सोबतच ठाकरे यांनी भाजपाचे हिंदुत्व (Hindutva) , केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर (Misuse of central systems)  त्याचबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (Leader of Opposition Devendra Fadnavis and MNS chief Raj Thackeray)  यांचा समाचार घेतला.

ठाकरे म्हणाले, आज एक भ्रम निर्माण केल्या जातो की हिंदुत्वाचे रक्षक भाजपच. इथे जमलेला हिंदु हा मेल्या आईचे दूध प्यालेला नाही. १ मे रोजी भाजपची सभा ते म्हणाले आम्ही मुंबई स्वतंत्र करणार, जे पोटात तेच ओठावर आले,  अरे तुमच्या साठ पिढ्या आल्या तरी जमणार नाही. हौतात्म्य पत्करून मुंबई मिळवलेली आहे. देशातली पहिली बुलेट ट्रेन आपण मागितलेली नाही हा मुंबई तोडण्याचा डाव. संघाला दोन चार वर्षात १०० वर्ष होतील. मग स्वातंत्र्य लढ्यात संघ कुठेच नव्हता, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जनसंघ होता.

ठाकरे कुटुंब या लढ्यात. संयुक्त महाराष्ट्र समितीने सर्वांना एकवटले मात्र यातून सर्वप्रथम जनसंघ बाहेर पडला कशावरून जागावाटपावरुन. तेव्हापासून मुंबईचा लचका तोडण्याचा हेतू यांचा. दुसरा महत्वाचा मुद्दा महागाई. हिंदुत्व श्वास मराठी प्राण. महागाई वर कोणी बोलत नाही. कोविड बैठकीत मा. पंतप्रधान समारोप करतांना कोविड वर उपाय काय तर पेट्रोल डीझेलचे दर कमी करा असे म्हणतायत असे वाटले. मुंबई ओरबडण्यासाठी तुम्हाला हवी आहे आम्ही सर्व संकटात मदतीला शिवसैनिक उडी मारतो.

आमची युतीत २५ वर्षे सडली. आज विश्वास बसत नाही. किती वाईट पणाने समोर येतय. सामनात जे येत ते देशाच्या हिताचे. सामनाचा एक लेख दाखवा ज्या पद्धतीने तुम्ही आमच्यावर टीका करायहेत. वाजपेयी पेट्रोल दरवाढ झाल्यावर बैलगाडीतून संसदेत गेले होते तो संवेदनशील भाजप कुठे आहे? म्हाळगी प्रबोधिनीत यांचे चिंतन तेव्हा जावस वाटायचं. मग आता प्रश्न पडतो तिथे तुम्ही हे शिकवता का?  ते शिकेलेले कुठे गेले? आता कोण आहे तिथे?  असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.