दुबईत आहे सानिया मिर्झाचा आलिशान व्हिला, कोट्यावधींच्या घराची होतेय चर्चा

Sania Mirza Dubai Home: टेनिस स्टार सानिया मिर्झा आता तिचा पती आणि माजी क्रिकेटर शोएब मलिकपासून (Shoaib Malik) विभक्त झाली आहे. यानंतर सानियाच्या संपत्तीची देखील बरीच चर्चा सुरु आहे. सानिया मिर्झाचे दुबईतील घर अतिशय आलिशान आहे. याच घराची सर्वात जास्त चर्चा होताना दिसत आहे.

एशियन पेंट्स व्हेअर द हार्ट इजच्या सीझन 7 मध्ये सानिया मिर्झाने तिच्या आलिशान घराची झलक दाखवली होती. सानियाचे हे घर खूप सुंदर आहे.सानिया मिर्झाचा हा आलिशान व्हिला दुमजली आहे. जे पूर्णपणे पांढऱ्या रंगात रंगवलेले आहे. हा बंगला ग्रीक डिझाईनने तयार करण्यात आला आहे.

घरात राहण्याची मोठी जागा आहे. ज्याला पांढऱ्या रंगाच्या सोफ्यांनी सजवले आहे. अनेक अभिनेत्री येथे अनेकदा फोटोशूट करताना दिसतात.सानियाच्या या संपूर्ण व्हिलामध्ये मार्बल फ्लोअरिंग करण्यात आले आहे. पांढऱ्या भिंतींमुळे घराला अभिजात लुक मिळतो.

सानियाच्या बंगल्यात तुम्हाला एक मोठी बागही पाहायला मिळेल. जिथे अनेक झाडे लावली आहेत. सानियाने बागेत बसण्याची जागाही तयार केली आहे. जिथे अभिनेत्री तिच्या मोकळ्या वेळेत दर्जेदार वेळ घालवते. या सर्व गोष्टींशिवाय सानियाने घरात एक मोठा स्विमिंग पूल बनवला आहे.या दुबई व्हिलामध्ये सानिया आपल्या मुलासोबत राहते. ज्याचे फोटो तिने इंस्टाग्रामवर अनेकदा शेअर केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

मनोज जरांगे पाटील मनुवादी, मनुवादी लोकांना आरक्षण देऊ नये; लक्ष्मण माने यांचे वक्तव्य

राज्यातील विमानतळांचा कालबद्धरित्या विकास करावा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘काहीही झालं तरी झुकणार नाही’, ईडीकडून ११ तास चौकशीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया