Paytm Payments Bank | पेटीएम पेमेंटस् बँकेला पाच कोटी 49 लाख रुपयांचा दंड 

Paytm Payments Bank fined Rs 5 Crore 49 Lakh |  अर्थखात्या अंतर्गत असलेल्या वित्त अन्वेषण विभागानं पेटीएम पेमेंटस् बँकेला पाच कोटी 49 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. यामुळे पेटीएम पेमेंटस् बँकेच्या अडचणींत वाढ झाली आहे.
अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या पत्रकानुसार, वित्त अन्वेषण विभागानं बेकायदा कृत्यांमध्ये गुंतलेल्या काही संस्था आणि त्यांच्या व्यावसायिक संबंधाच्या संदर्भात, सक्तवसुली संचालनालयाकडून मिळालेल्या विशिष्ट माहितीच्या आधारे पेटीएम पेमेंटस् बँकेच्या व्यवहारांचा तपास सुरू केला.

त्यामध्ये ऑनलाईन जुगाराचं आयोजन आणि सुविधा प्रदान करण्यासारख्या बेकायदा आयोजनातून मिळालेले पैसे बँक खात्यांद्वारे पेटीएम पेमेंटस् बँकेच्या (Paytm Payments Bank)  खात्यात पाठवण्यात आल्याचं या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

विधिमंडळाच्या लॉबीत सत्ताधारी आमदारांची धक्काबुक्की महाराष्ट्राला लाज आणणारी: Nana Patole

Sambhaji Bhide: संभाजी भिडेंच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न, काळे झेंडेही दाखवले

Muralidhar Mohol | मोहोळांनीही उघडले लोकसभेचे पत्ते; म्हणाले, ‘मी लोकसभेची तयारी करतोय, पण…’