‘पवारांच्या राजकारणाचा आता लोकांना कंटाळा आलाय, मोठी लॉटरी एकदाच लागते पवार साहेब नेहमी नाही’

मुंबई –   महाविकास आघाडीच्या युवा आमदारांनी काल सकाळी शरद पवार यांची त्यांच्या घरी भेट घेतली. यावेळी  सुमारे 2 तास शरद पवार यांनी या आमदारांशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली.पाच राज्यांच्या निवडणूक निकालांबाबत आमदारांनीही आपल्या मनातील प्रश्न शरद पवार यांच्यासमोर ठेवले. बैठक आटोपल्यानंतर आमदार निघून जात असताना शरद पवार उभे राहिले, दोन्ही हात धरून मुठ घट्ट धरली आणि म्हणाले की घाबरण्याची गरज नाही, आम्ही राज्यात भाजपची सत्ता येऊ देणार नाही.

भाजप त्यांचा राजकीय प्रतिस्पर्धी असेल, पण त्यांच्या अनेक नेत्यांकडून शिकण्यासारख्या गोष्टी आहेत, हे मतही शरद पवार यांनी या तरुण आमदारांसमोर व्यक्त केले आहे. विशेषत: 24 तास काम करण्याची तयारी, योजनांचे मार्केटिंग आणि निवडणुकीची रणनीती असे अनेक गुण भाजप नेत्यांकडून शिकायला हवेत. यासोबतच शरद पवार यांनी तरुण आमदारांना सहकार क्षेत्र आणि सामाजिक क्षेत्रात उतरण्याचा मंत्रही दिला.

दरम्यान, याच मुद्द्यावरून आता भाजप नेते निलेश राणे यांनी शरद पवार यांना टोला लगावला आहे. ते म्हणाले, भाजपची सत्ता पवार साहेबांना कशी परवडेल कारण त्यात दाऊदचा सहभाग नसेल. पवार साहेबांनी खरं जनमत घेतलं तर त्यांना कळेल त्यांच्या राजकारणाचा आता लोकांना कंटाळा आलाय, मोठी लॉटरी एकदाच लागते पवार साहेब नेहमी नाही. असं राणे म्हणाले.